AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरडा बारामती सोडणार असं ऐकलय…संजय राऊत यांची अजितदादांवर खोचक टीका

"मोदी लालकिल्ल्यावर भाषण करत होते आणि जम्मू काश्मीरमध्ये जवानांचे बलिदान झाले. 30 दिवसात 27 हल्ले झाले. 17 जवान शहीद झाले. अनेक घायाळ झाले. हे 56 इंचाच्या छातीचं सरकार आहे. त्यांच्या छातीतील हवा आपण काढून टाकली आहे"

सरडा बारामती सोडणार असं ऐकलय...संजय राऊत यांची अजितदादांवर खोचक टीका
संजय राऊतImage Credit source: ANI
| Updated on: Aug 16, 2024 | 1:35 PM
Share

“ओपनिंग बॅटसमनच भाषण झालं. उद्धव ठाकरे यांचं. ही वर्ल्डकपची टीम आहे. आपण एक कप जिंकला आहे, दिल्लीचा. आता महाराष्ट्राचा सामनाही आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज वाजपेयींची पुण्यतिथी आहे. आता बनावट आणि बोगस भाजप आहे. चोरांचा आहे. आम्ही ज्या ओरिजिनल भाजपसोबत काम केलं. त्या वाजपेयींची पुण्यतिथी आहे. मला वाजपेयींच्या कवितेची ओळ आठवते. ती आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. ती मोदी शाह यांच्यासाठी नसेल. हार नही मानुंगा मै, रार नही मानुंगा मैं… आम्ही हार मारणार नाही. झुकणार नाही. हा महाराष्ट्र दिल्लीच्या हुकूमशाहीविरुद्ध झुकणार नाही. वाकणार नाही. तुम्हाला फोडून काढल्याशिवया राहणार नाही. हा या मेळाव्याचा अर्थ आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“आपल्या वक्तव्याने मोदींच्या 56 इंचाच्या छातीची आठवण केली. स्वत: मोदीच विसरले आहेत. ती छातीच नाही. तो मातीचा रिकामा खोका आहे. नुसती छाती जरी असती तर देशाची ही अवस्था झाली नसती. मोदी लालकिल्ल्यावर भाषण करत होते आणि जम्मू काश्मीरमध्ये जवानांचे बलिदान झाले. 30 दिवसात 27 हल्ले झाले. 17 जवान शहीद झाले. अनेक घायाळ झाले. हे 56 इंचाच्या छातीचं सरकार आहे. त्यांच्या छातीतील हवा आपण काढून टाकली आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘तिरंग्याच रक्षण कोणी करेल तर तो भगवाच’

“सुप्रिया ताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची. या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. बारामतीत महाराष्ट्र लढला. महाराष्ट्रातील तुमचे लाडके भाऊ आहेत. त्यांनी रंग बदलला. ते पिंक झालेत. सरडा रंग बदलतो. अचानक पिंक कसा होऊ शकतो. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलं. पण एक सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला भगवाच आहे. केसीआरचा गुलाबी रंग आहे. तेलंगणात ते पराभूत झाले. मी त्यांना सांगितलं कुठं आणला पिंक. मी म्हटलं पिंक जिंकणार नाही. एक तर भगवा जिंकणार किंवा तिरंगा. तिरंग्याच रक्षण कोणी करेल तर तो भगवाच असं बाळासाहेब म्हणायचे. त्यामुळे पिंकची चिंता नाही. तो गेला. आता राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. मशाल आहेच बुडाला आग लावायला” असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक