अशोक चव्हाण यांच्या हाती ‘कमळ’; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Ashok Chavan Inter in BJP in the presence of Devendra Fadnavis : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. देशभरात निवडणुकीचं वारं वाहतंय. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढते आहे. अशात महाराष्ट्र काँग्रेसला सर्वात मोठा धक्का... अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश...

अशोक चव्हाण यांच्या हाती 'कमळ'; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 8:21 AM

मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : गेली तीन दशकं काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे, बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.

आज पक्षप्रवेश, उद्या राज्यसभेची उमेदवारी?

अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे आज पक्ष प्रवेश केल्यानंतर उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा उमदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

राज्याच्या राजकारणावर कमांड असणारा नेता

राज्याच्या राजकारणात होल्ड असणारा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं. मराठवाड्यातही अशोक चव्हाण यांच्या नावाला वलय आहे. अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विशेषत: नांदेडमध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. हिंगोली, लातूर आणि अर्थातच नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणात अशोक चव्हाण यांचा होल्ड आहे.

कोण आहेत अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण यांच्यावर बालपणापासूनच काँग्रेसी विचारांचा प्रभाव राहिला. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हेदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. त्यामुळे लहानपणापासूनच अशोक चव्हाण यांच्यावर राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार झाले. पुणे विद्यापीठात शिकत असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बनले. विद्यार्थी प्रतिनिधी ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्याचा राजकीय प्रवास राहिला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज

पुढे आमदार, खासदार, मंत्री ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी सांभाळली. 2014 ते 2019 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. ऑगस्ट 2023 ते कालपर्यंत अशोक चव्हाण हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य होते. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे होती. आज अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.