जीआर निर्देशांचं उल्लंघन केल्याचा आरोप, नितीन राऊतांविरुद्ध भाजप हक्कभंग प्रस्ताव आणणार

काँग्रेस मंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध भाजप हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. नितीन राऊत यांनी जीआरच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप भापजने केला आहे.

जीआर निर्देशांचं उल्लंघन केल्याचा आरोप, नितीन राऊतांविरुद्ध भाजप हक्कभंग प्रस्ताव आणणार

नागपूर : काँग्रेस मंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध भाजप हक्कभंग प्रस्ताव (Proposal Of Infringement Against Nitin Raut) आणणार आहे. नितीन राऊत यांनी जीआरच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप भापजने केला आहे. नागपूर शहर आणि जिल्हा येथील विकासकामासंदर्भात झालेल्या बैठकीचं निमंत्रण नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या भाजप विधानसभा, विधानपरिषद आणि राज्यसभा सदस्यांना दिले नसल्याचा आरोप भाजपने नितीन राऊतांवर केला आहे (Proposal Of Infringement Against Nitin Raut).

“नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शासनाच्या सौजन्याची वागणूक/ प्रोटोकॉल या शासन परिपत्रकाचे सर्रास उल्लंघन करुन जिल्ह्याचे भाजपचे 10 आमदार, राज्यसभा सदस्य आणि महापौर यांना हेतुपुस्कर बैठकीत न बोलावल्यामुळे यांच्याविरुद्ध विधानसभेमध्ये विशेष हक्क भंगाचा प्रस्ताव आणणार”, असे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

18 जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर शहर आणि जिल्हा येथील विकासकामासंदर्भात झालेल्या बैठकीची सूचना आणि पत्र किंवा निमंत्रण नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विधानसभा, विधानपरिषद आणि राज्यसभा सदस्यांना मिळाले नाही. त्यामुळे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शासन परिपत्रक 2013 खासदार, आमदार यांना सौजन्याची वागणूक या प्रोटोकॉलचे सर्रास उल्लंघन केले आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

9 महिने सरकार बनल्यानंतर एकही रुपया शहर आणि जिल्ह्याला आजपर्यंत मिळालेला नाही. याउलट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी दिलेला कोट्यावधी रुपयाचा निधी महाराष्ट्र सरकारने परत घेतला आहे. यासंदर्भात या बैठकीत भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित करु नये, म्हणून पालकमंत्र्यांनी बैठकीचं निमंत्रण दिलं नाही, असा आरोप भाजपने केला आहे (Proposal Of Infringement Against Nitin Raut).

नितीन राऊत यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती : कृष्णा खोपडे

नितीन राऊत मंत्री झाल्यानंतर या जिल्ह्याची पहिलीच आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व विषयावर चर्चा होऊ नये आणि विकासकामाचे मुद्दे समोर येऊ नये. म्हणून भाजप आमदारांना निमंत्रण न दिल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला.

“नितीन राऊत हे वरिष्ठ आमदार असून यापूर्वी सुद्धा अनेक मंत्रिपदं त्यांनी भूषविली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती”, असंही कृष्णा खोपडे म्हणाले.

“या बैठकीत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, पश्चिमचे आमदार विकास ठाकरे आणि माजी आमदार प्रकाश गजभिये हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिकडम सरकारचे तिघेही उपस्थि होते. यांना कुणी सूचना दिली, कुणी बोलावले? हे बिन बुलाये मेहमान होते का?”, असा सवालही कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला आहे.

Proposal Of Infringement Against Nitin Raut

संबंधित बातम्या :

“काँग्रेस मंत्री निष्क्रिय” पुण्यातील काँग्रेस शहराध्यक्षांचेच महाविकास आघाडीविरुद्ध आंदोलन

शरद पवार माळशिरसमधील निष्ठावंताच्या घरी, भालचंद्र पाटलांच्या निधनानंतर कुटुंबाची सांत्वन भेट

Published On - 5:39 pm, Sun, 19 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI