लसीकरणातून भाजपच्या प्रचारावर काँग्रेसचा आक्षेप, कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन

गजानन उमाटे

गजानन उमाटे | Edited By: सागर जोशी

Updated on: Jul 27, 2021 | 8:59 AM

नागपूरातील काही लसीकरण केंद्रावर भाजपचे बॅनर्स लागल्याची तक्रार काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आढावा बैठकीतूनच थेट नागपूर पोलीस आयुक्त आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांना फोन केला.

लसीकरणातून भाजपच्या प्रचारावर काँग्रेसचा आक्षेप, कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन
नाना पटोले

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरुन प्रचाराची संधी नगरसेवक सोडत नाहीत. नागपूरातील काही लसीकरण केंद्रावर भाजपचे बॅनर्स लागल्याची तक्रार काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आढावा बैठकीतूनच थेट नागपूर पोलीस आयुक्त आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांना फोन केला. लसीकरण केंद्रावरील भाजपचे बॅनर्स काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. (Congress and BJP face off in Nagpur over banners at vaccination centers)

नागपूर महानगरपालिकेत गेल्या 15 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. आता निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने पुन्हा एकदा भाजप जोमानं कामाला लागलीय. भाजपला टक्कर देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मैदानात उतरले आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोना लसीकरण केंद्रांवर बॅनर्सवरुन काँग्रेस भाजप आमनेसामने पहायला मिळाली. काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणूकीची तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले.

नाना पटोले फडणवीसांविरोधात शड्डू ठोकणार?

महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत बोलताना पटोले यांनी मोठं विधान केलंय. पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपला हादरे देण्याची काँग्रेसची व्यूव्हरचना

पहिल्या दिवशी नागपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातूनच भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आखल्याचं पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या : 

नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई

फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेसच्या जोर बैठका, नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी!

Congress and BJP face off in Nagpur over banners at vaccination centers

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI