नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, चार आमदारांनंतर आता खासदारालाही लागण

नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यानंतर वडील आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली

नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, चार आमदारांनंतर आता खासदारालाही लागण

नांदेड : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलापाठोपाठ चिखलीकरांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा पडलेला दिसत आहे. चार आमदारांनंतर आता खासदारालाही कोरोना झाला आहे. (Nanded BJP MP Pratap Patil Chikhalikar Corona Positive)

नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांचे वडील आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. पिता-पुत्रावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत.

प्रवीण पाटील चिखलीकर

मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याआधी काँग्रेसच्या चार आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचा : आधी नवनीत राणा, आता रवी राणांना कोरोना संसर्ग, कुटुंबातील एकूण 12 जण बाधित

हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जवळगावकर यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. माधवराव जवळगावकर हे नांदेड काँग्रेसमधील मोठे नेते आहेत. (Nanded BJP MP Pratap Patil Chikhalikar Corona Positive)

कोरोना पॉझिटिव्ह आलेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे आणि काँग्रेसचेच विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांनी कोरोनावर मात केली आहे.

नांदेडमधील कोरोना पॉझिटिव्ह लोकप्रतिनिधी

1) अशोक चव्हाण (आमदार- भोकर, काँग्रेस) – कोरोनामुक्त
2) मोहन हंबर्डे (आमदार- नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ) – कोरोनामुक्त
3) अमरनाथ राजूरकर (आमदार – विधानपरिषद, कॉंग्रेस) – कोरोनामुक्त
4) माधव जवळगावकर (आमदार- हदगाव, कॉंग्रेस) – उपचार सुरु
5) प्रवीण पाटील चिखलीकर (नांदेड जिल्हा परिषद सदस्य) – उपचार सुरु
6) प्रताप पाटील चिखलीकर (खासदार- नांदेड, भाजप) – उपचार सुरु

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

(Nanded BJP MP Pratap Patil Chikhalikar Corona Positive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *