AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगींबाबतच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंविरोधात भाजप तक्रार करणार, पण कायदा काय सांगतो?

यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत. त्याबाबतची माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली. पण उद्धव ठाकरे विरोधात आता तक्रार दाखल होऊ शकते का? याबाबत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

योगींबाबतच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंविरोधात भाजप तक्रार करणार, पण कायदा काय सांगतो?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 6:28 PM
Share

मुंबई : नारायण राणे यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेली अटकेची कारवाई आणि त्यानंतर मिळालेला जामीन यामुळे भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलंच आक्रमक झाले आहेत. आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजप आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजप आता उद्धव ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत. त्याबाबतची माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली. पण उद्धव ठाकरे विरोधात आता तक्रार दाखल होऊ शकते का? याबाबत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Can a complaint be lodged against CM Uddhav Thackeray?)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार होऊ शकत नाही. तक्रार दाखल करुन घेताना कायदेशीर अडचणी येऊ शकतात. कायद्यानुसार एखादी घटना घडली तर लगेच तक्रार दाखल करणं गरजेचं आहे. मात्र याला तीन वर्षे उलटून गेलीत त्यामुळे काय वाद निर्माण झाला असं वाटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर कारवाई होऊ शकत नाही, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्याचं अज्ञान उघड पडलं, म्हणून हा सगळा थयथयाट

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं जाहीर कार्यक्रमात स्वताचं अज्ञान उघड पडलं. स्वताचं अज्ञान उघड पडलं म्हणून हा सगळा थयथयाट चाललेला आहे. राणेसाहेब याआधीही अनेकदा बोलले आहेत त्यांची बोलण्याची एक शैली आहे. परंतु सेनेने राडा केला. झालेल्या घटनेमुळे आपण देशाची माफी मागणार का?, असा सवाल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची…

संबंधित बातम्या : 

Can a complaint be lodged against CM Uddhav Thackeray?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.