खासदारकीचा राजीनामा देणार नाही, नारायण राणेंचं स्पष्टीकरण

भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्यापासूनच नारायण राणे (Narayan Rane) नाराज होते. शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने राणेंना साईडलाईन केल्याचं चित्र आहे. या नाराजीतूनच राणे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती होती. पण राणेंनी या वृत्ताचं खंडन केलं.

खासदारकीचा राजीनामा देणार नाही, नारायण राणेंचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 8:26 PM

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे (Narayan Rane) राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण हे वृत्त राणेंनी फेटाळलंय. भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्यापासूनच नारायण राणे (Narayan Rane) नाराज होते. शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने राणेंना साईडलाईन केल्याचं चित्र आहे. या नाराजीतूनच राणे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती होती. पण राणेंनी या वृत्ताचं खंडन केलं.

काँग्रेससोबत फारकत घेतल्यानंतर नारायण राणे भाजपात जातील, अशी चर्चा होती. पण भाजपात न जाता राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि ते एनडीएचा घटकपक्ष झाले. भाजपने त्यांना राज्यसभेवरही पाठवलं. राज्यात राणेंना मंत्रिपद मिळेल, असं बोललं जात होतं. पण शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना दिल्लीच्या राजकारणात जावं लागलं. आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे.

नारायण राणे यावेळी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय. 2014 च्या निवडणुकीत पराभव झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातूनच नाराणय राणे पुन्हा निवडणूक लढतील, असंही नितेश राणे म्हणाले. 2014 ला नारायण राणेंचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता.

2014 ला काय झालं होतं?

2014 ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या वैभव नाईक यांना 71 हजार, काँग्रेसच्या नारायण राणे यांना 60,500, तर भाजपच्या बाब मोंडकर यांना 4500 आणि राष्ट्रवादीच्या पुष्पसेन सावंत यांना 2500 मते पडली होती. नारायण राणेंचा अनपेक्षित पराभव करून वैभव नाईक हे राज्यात जाएन्ट किलर म्हणून गणले जाऊ लागले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.