AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझं घर आणि शाळेची रेकी सुरु’, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप; दोन व्यक्तींचे फोटोही ट्विट

नवाब मलिक यांनी एक ट्विट करुन खळबळजनक आरोप केलाय. गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर दोन व्यक्तींचे फोटोही मलिक यांनी ट्विट केले आहेत. 

'माझं घर आणि शाळेची रेकी सुरु', नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप; दोन व्यक्तींचे फोटोही ट्विट
हे दोन व्यक्ती घराची रेकी करत असल्याचा नवाब मलिकांचा आरोप
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 8:34 PM
Share

मुंबई : मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणापासून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर जोरदार टीका आणि आरोपांची मालिका सुरु ठेवलीय. पत्रकार परिषद आणि ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक रोज नवे आरोप करताना गेल्या काही दिवसांपासून दिसून आले. आज मात्र, मलिक यांनी एक ट्विट करुन खळबळजनक आरोप केलाय. गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर दोन व्यक्तींचे फोटोही मलिक यांनी ट्विट केले आहेत.

‘या गाडीतील हे लोक गेल्या काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची रेकी करत आहेत. कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोतील लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला माझी काही माहिती हवी असेल तर मला येऊन भेटा. मी सर्व माहिती देतो’, असं ट्विट मलिक यांनी केलं आहे. तसंच या ट्विटमध्ये त्यांनी दोन व्यक्तींचे फोटोही शेअर केले आहेत.

नवाब मलिकांचा नारायण राणेंवर घणाघात

महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा करतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आघाडी सरकार पडण्याची तारीखही जाहीर केलीय. राणेंच्या या भविष्यवाणीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केलीय. काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय, असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. त्याचबरोबर सरकार पडेल ही भविष्यवाणी करुन देवेंद्र फडणवीस थकले. त्यानंतर चंद्रकांत पाटीलही बोलायचे. आता नारायण राणे यांनी भविष्यवाणीचं टेंडर घेतलं आहे, अशी टीकाही मलिकांनी केलीय.

‘भाजपचा राष्ट्रवाद बोगस’

भाजपाचा राष्ट्रवाद हा मनूवादी भूमिका जाहीर करणारा आहे. त्यांना समाजात पुन्हा वर्ण व्यवस्था आणि जातीभेद आणायचा आहे. हा बोगस राष्ट्रवाद असून तो कधीच आम्ही मान्य करणार नाही, असा घणाघातही मलिकांनी केलाय. राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाने संविधा दिना निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी मलिक यांनी भाजपवर सडकून टीका केली. भारत एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकशाही व्यवस्था निर्माण करणारा देश राहिल. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद आहे. आपला राष्ट्रवाद हा राज्यघटनेला बांधिल असणारा आहे. त्या राष्ट्रवादासाठी आपल्याला लढा दयायचा आहे, असंही मलिक म्हणाले.

इतर बातम्या : 

कामाला लागा, छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आदेश; आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरं जाण्याचा दावा

‘नारायण राणेंनी जरा जास्तच मुदत दिली, त्यांचे खास आभार’, जयंत पाटलांचा खोचक टोला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.