Nawab Malik Arrest : महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची लढाई आता रस्त्यावर! मलिक प्रकरणात दोन्ही बाजुने आंदोलनाची घोषणा

आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते उद्या मंत्रालय परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करणार असल्याचं मंत्री भुजबळ यांनी म्हटलंय. तर मलिकांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते उद्यापासून राज्यभरात आंदोलन करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजपची लढाई आता रस्त्यावर पाहायला मिळणार आहे.

Nawab Malik Arrest : महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची लढाई आता रस्त्यावर! मलिक प्रकरणात दोन्ही बाजुने आंदोलनाची घोषणा
छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:22 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलीय. तत्पूर्वी मलिक यांना आज अंमलबजावणी संचलनालाय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पीएमएलए कोर्टानं मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मलिक यांच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशावेळी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलीय. त्यावर मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं महाविकास आघाडी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. इतकंच नाही तर आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते उद्या मंत्रालय परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करणार असल्याचं मंत्री भुजबळ यांनी म्हटलंय. तर मलिकांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते उद्यापासून राज्यभरात आंदोलन करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजपची लढाई आता रस्त्यावर पाहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्त्यांचं राज्यभरात आंदोलन

मलिकांवरील कारवाईनंतर महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेणार आहे. महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांकडून भाजपविरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय. ‘आता आम्ही सर्वजण बसलो होतो. आमी सर्वजण एकत्रितपणे कायदेशीररित्या जनतेत जाऊन मुकाबला करु. उद्या सकाळी 10 वाजता मंत्रालयाशेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही मंत्री निषेध म्हणून धरणं धरणार आहोत. तसंच परवापासून राज्यातील सर्व तालुका, जिल्हा, शहर पातळीवर शांतपणे मोर्चा आंदोलन, धरणं आम्ही करु’ असा इशारा भुजबळांनी दिलाय.

चंद्रकांतदादांचेही भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनाचे आदेश

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्यापासून निदर्शने सुरू करेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. पाटील म्हणाले की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने 1993 बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना 3 मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार साहेब नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही.

राज्यातील भाजपा नेते, कार्यकर्ते व नागरिकांना आपण आवाहन करत आहोत की, हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे, राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत निदर्शने केली पाहिजेत, आंदोलनाची तीव्रता वाढविली पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार वठणीवर आणावे लागेल. उद्या सुरुवातीला 1993 च्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून निदर्शने सुरू करावीत, असं आवाहन पाटील यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना केलंय.

इतर बातम्या :

‘दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खं सरकार उभं’, मलिकांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Nawab Malik Arrested : शरद पवारांच्या उपस्थितीत ‘सिल्व्हर ओक’वर खलबतं, काँग्रेस नेतेही पवारांच्या भेटीला! मलिकांबाबत कोणता निर्णय?

Non Stop LIVE Update
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.