राष्ट्रवादीला धक्का, चिंचवडमधील उमेदवाराचा अर्ज बाद

चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे (Prashant Shitole) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

राष्ट्रवादीला धक्का, चिंचवडमधील उमेदवाराचा अर्ज बाद

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे (Prashant Shitole) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. पक्षाचा अधीकृत एबी फार्म नसल्याने आघाडीचे प्रशांत शितोळे (Prashant Shitole) यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला.

राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी कालच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतून भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधातील मोठा स्पर्धक बाद झाला आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे हे आता राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार ठरण्याची चिन्हं आहेत. राहुल कलाटे यांनी चिंचवड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पक्षांकडून अशी अपेक्षा नव्हती, कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देत पुढील राजकीय वाटचाल कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवणार, असं प्रशांत शितोळे म्हणाले.

Published On - 3:19 pm, Sat, 5 October 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI