राज ठाकरेंचा फोटो शेअर, एकनाथ खडसेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा" असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच केलं होतं.

राज ठाकरेंचा फोटो शेअर, एकनाथ खडसेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
राज ठाकरे, एकनाथ खडसे

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत खडसेंनी अभिष्टचिंतन केलं आहे. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कोण कुठल्या पक्षासोबत युती-आघाडी करणार, याची उत्सुकता असताना खडसेंनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (NCP leader Eknath Khadse Greets MNS Chief Raj Thackeray on birthday)

एकनाथ खडसे यांचे ट्विट काय?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राज ठाकरे जी… आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले मनःपूर्वक अभिष्टचिंतन !” असे ट्विट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या ऑफिशिअल अकाऊण्टवरुन करण्यात आले आहे. सोबतच राज ठाकरेंचा खास फोटोही शेअर करण्यात आला आहे.

राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

“सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे. राज्यात एका दिवसात 12,207 रुग्ण सापडले आहेत. तर दीड लाखाहून अधिक रुग्ण उपचार घेत आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा” असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच केलं होतं.

राज ठाकरे यांच्या पत्रात काय?

“दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो.तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल 12,207 नवे रुग्ण सापडले आणि 1,64,743 जण आत्ताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.” असं पत्र राज ठाकरे यांनी शेअर केलं होतं.

संबंधित बातम्या :

या वातावरणात वाढदिवस साजरा करणं पटत नाही, माझ्या भेटीसाठी येऊ नका, तुमच्या घरीच राहा: राज ठाकरे

(NCP leader Eknath Khadse Greets MNS Chief Raj Thackeray on birthday)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI