रासप कार्यकर्त्यांचा आघाडीला पाठिंबा, जयंत पाटील यांचा मोठा दावा

महायुतीतील नाराज असलेल्या महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या रासपचे कार्यकर्ते आघाडीला मदत करत आहेत, असा दावा जयंत पाटील (Jayant Patil NCP) यांनी केला.

रासप कार्यकर्त्यांचा आघाडीला पाठिंबा, जयंत पाटील यांचा मोठा दावा

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil NCP) यांनी खळबळजनक दावा केला आहे. महायुतीतील नाराज असलेल्या महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या रासपचे कार्यकर्ते आघाडीला मदत करत आहेत, असा दावा जयंत पाटील (Jayant Patil NCP) यांनी केला. सांगलीमध्ये जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रासपचा आघाडीला पाठिंबा

भाजपाकडून मंत्री महादेव जानकर यांना चुकीची वागणूक दिली, म्हणून रासपा कार्यकर्त्यांनी आमच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले, “महादेव जानकरांना भाजपने जी वागणूक दिली, ती अपमानजनक आहे. रासपच्या उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म देऊन त्यांना भरायला लावले. त्यावरुन त्यांची मित्रपक्षांशी वागणूक कशी आहे हे दिसून येतं. भाजपला रासपने पाठिंबा दिला तो धनगर आरक्षणासाठी. मात्र ते आरक्षणही मिळालं नाही. मात्र रासपलाही हाकलून लावण्याचं षडयंत्र हे भाजपने केलं. म्हणून रासपचे सर्व कार्यकर्ते जागोजागी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. रासपच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही भविष्यात पूर्ण ताकदीने मदत करु”.

मोदींच्या क्लिपची खिल्ली

“एका क्लिपवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका सुरू आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या अनेक क्लिप आहेत, ज्यातून मोदी यांची खिल्ली उडवली जाते. जसं शाळेत मुलगा नापास झाला की वडिलांना बोलवलं जातं, तसं महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नापास झाले म्हणून त्यांच्या वडीलधारी राष्ट्रीय नेत्यांना महाराष्ट्रात यावे लागले, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

आमचं हेलिकॉप्टर बंद पडत नाही

आमचं हेलिकॉप्टर बंद पडत नाही, मग मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर बंद कसं पडतं, राज्याची घडी विस्कटलेली आणि बिघडलेली आहे, म्हणूनच मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टरसुद्धा बंद पडत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

तेल लावलेला फोटो दाखवा

तेल लावलेला पैलवान म्हणून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला स्वतः चा फोटो प्रदर्शित करावा, असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र तर आहेतच, शिवाय अनेक मतदारसंघात नाराज भाजपा आणि शिवसेनेचे नेतेसुद्धा आमच्या आघाडीला मदत करत आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *