AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“स्वप्नातलं सत्यात फक्त पवार कुटुंबाने उतरवलं; चंद्रकांत दादा, अजून…” रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का, या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला

स्वप्नातलं सत्यात फक्त पवार कुटुंबाने उतरवलं; चंद्रकांत दादा, अजून... रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
रुपाली चाकणकर आणि चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Jan 16, 2021 | 3:25 PM
Share

पुणे : “स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. चंद्रकांत दादा, अजून काही स्वप्नं आहेत, ती साकार होताना तुम्हाला पाहायची आहेत” अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) स्वप्नात आहेत का, या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा चाकणकरांनी समाचार घेतला. (NCP Leader Rupali Chakankar takes a dig at Chandrakant Patil for taunting Supriya Sule)

“चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का, असे मत व्यक्त केले. एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. नाहीतर कशाला 105 आमदार घेऊन घरी बसावं लागलं असतं. त्यामुळे एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी, अशक्य ते शक्य करुन दाखवले त्याला एक वर्ष झालं. अजून काही स्वप्नं आहेत ते साकार होताना चंद्रकांत दादा तुम्हाला पाहायची आहेत. आपली वैफल्यग्रस्त, नैराश्यजनक मानसिकता आम्ही समजू शकतो, आपणच सत्तेत येण्याची दिवा स्वप्नं पाहायची सोडून विरोधात आहोत हे सत्य स्वीकारावं” असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला.

Chandrakant Patil यांनी Supriya Sule ताई स्वप्नात आहेत का असे मत एका वृत्त वाहिनी सोबत बोलताना दिले. एक गोष्ट त्यांनी…

Posted by Rupali Chakankar on Saturday, 28 November 2020

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्या स्वप्नात आहेत का?” असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो किंवा इतर विषय, हे सरकार कशाबद्दलच खात्री देत नाही” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. (NCP Leader Rupali Chakankar takes a dig at Chandrakant Patil for taunting Supriya Sule)

हेही वाचा : ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’; सुप्रिया सुळेंची मोदींवर खोचक टीका

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांपेक्षा सुप्रिया सुळे यांना प्राधान्य देतील, असेही याआधी चंद्रकांतदादा म्हणाले होते.

संबंधित बातम्या

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली? अजित पवारांची फटकेबाजी

तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का?; चंद्रकांतदादांचा टोला

(NCP Leader Rupali Chakankar takes a dig at Chandrakant Patil for taunting Supriya Sule)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.