आमदार ज्योती कलानींचा निवडणूक लढण्यास नकार, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?

ज्योती कलानी यांच्या सूनबाई पंचम कलानी या भाजपच्या तिकीटावर उल्हासनगरच्या महापौरपदी निवडून आल्या आहेत. त्यापाठोपाठ कलानी कुटुंबालाही भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार ज्योती कलानींचा निवडणूक लढण्यास नकार, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?
Follow us
| Updated on: Sep 23, 2019 | 2:03 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार एकामागून एक पक्षाला रामराम ठोकत असतानाच कल्याणमध्येही राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी (NCP MLA Jyoti Kalani) यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर कोणाला उमेदवारी द्यावी, हा पेच पडण्याची चिन्हं आहेत.

ज्योती कलानी या राष्ट्रवादीचे माजी आमदार पप्पू कलानी यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या सूनबाई पंचम कलानी या भाजपच्या तिकीटावर उल्हासनगरच्या महापौरपदी निवडून आल्या आहेत. त्यापाठोपाठ कलानी कुटुंबालाही भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्योती कलानीही (NCP MLA Jyoti Kalani) भाजपचा झेंडा हाती धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगरमधून उमेदवारी मिळण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांना गळ घातल्याचं बोललं जातं. तर भाजपला महापालिकेत सत्तेपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा असलेल्या ओमी कलानी यांनीही भाजपकडून आमदारकीच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला आहे. शहरातील विद्यमान आमदार असल्याने आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी ओमी कलानी यांनी केली आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये नेमका कसा सामना रंगणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात कलानी कुटुंबाचा दबदबा आहे. कलानी कुटुंब हे कोणे एके काळी शरद पवारांचे निकटवर्तीय होते. चार वेळा आमदार राहिलेल्या पप्पू कलानी यांना 2013 मध्ये एका हत्या प्रकरणात कारावास ठोठावण्यात आला. त्यानंतर कलानी कुटुंबाचे पवारांशी असलेले संबंध कमी होत गेले. 2017 मधील उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या वेळी कलानी कुटुंब भाजपच्या संपर्कात आलं.

दरम्यान, उल्हासनगर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीकडून उल्हासनगर शहराध्यक्ष भारत गंगोत्री यांची विधानसभेसाठी दावेदारी निश्चित मानली जात आहे. गंगोत्री हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. त्यांच्या मातोश्री पुष्पा गंगोत्रीही राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा  निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.