मला अर्धांगवायूचा झटका आलेला नाही, माझी प्रकृती उत्तम : अमोल मिटकरी

माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लवकरच जनसेवेत रुजू होईन" असं खुद्द अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरुन सांगितलं.

मला अर्धांगवायूचा झटका आलेला नाही, माझी प्रकृती उत्तम : अमोल मिटकरी
Amol Mitkari
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 7:32 AM

अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचं वृत्त काल (सोमवार) समोर आलं होतं. त्यानंतर खुद्द अमोल मिटकरींनी आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही, माझी तब्येत ठणठणीत असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मिटकरींनी केले आहे. ट्विटर हॉस्पिटलमधून फोटो शेअर करत अमोल मिटकरी यांनी प्रकृतीची माहिती दिली.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“काल सकाळपासून माझ्या तब्येतीविषयी सुरु असलेल्या बातम्यांवर चर्चा सुरु आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लवकरच जनसेवेत रुजू होईन” असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं होतं?

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक आणि प्रख्यात गायिका वैशाली माडे यांचा रविवारी अकोला दौरा होता.  जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली” ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली. मात्र काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काही जणांना झाली. त्यामुळे तात्काळ मिटकरींना अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येऊ नये, अशी विनंती अमोल मिटकरी यांनी कार्यकर्ते आणि मित्रांना केली. परंतु मिटकरींना अर्धांगवायूचा झटका आल्याचं वृत्त पसरलं होतं.

कोण आहेत अमोल मिटकरी?

अमोल मिटकरी हे मूळ अकोला जिल्ह्यातील आहेत. अकोला-अमरावती सीमेवर असलेले कुटासा हे त्यांचे गाव. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती आणि किराणा दुकान होते. मात्र, त्यांच्या वडिलांना समाजसेवेची आवड होती. त्यांच्या कुटुंबावर गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचंड प्रभाव होता. समाजसेवेचा हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. मिटकरींना लहानपणापासून भजन कीर्तन यात रस होता. गावागावात ते भजन-कीर्तनातून संतांचे विचार पोहोचवत असत. त्यातूनच वक्ता म्हणून त्यांची जडणघडण झाली. जसजसं कळू लागलं तसतसं त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सर्व संत, संविधान यांचा अभ्यास सुरू केला आणि या महापुरुषांचे विचार ते व्याख्यानातून मांडू लागले. शिवव्याख्याते म्हणून त्यांचा लौकिकही वाढला.

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

अमोल मिटकरी यांना आपली वक्तृत्वशैली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दाखवायची होती. पण संधी मिळत नव्हती. अखेर ती संधीही आली. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तीने ही संधी मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली. शिवनेरीवरुन सुरु झालेल्या यात्रेवेळी अमोल मिटकरीचं नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं. पण या यात्रेची सांगता झाली तेव्हा मिटकरी यांच्या भाषणांची मागणी राष्ट्रवादीचेच उमेदवार करत होते. वाशिममध्ये यात्रा आली असताना अवघी 10 मिनिटे भाषण करायची संधी मिळाली आणि त्याचं सोनं करत मिटकरी यांनी मोठा पल्ला गाठला. आतापर्यंत व्याख्यान देऊन कुटुंब चालवणारे मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक झाले. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानपरिषदेवर घेतलं.

संबंधित बातम्या :

भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, उपचारानंतर प्रकृती स्थिर

वाटलं, आमदार झाल्यावर उत्साहात दिवाळी साजरी करु पण…, वडिलांच्या आठवणीने अमोल मिटकरी भावूक

(NCP MLC Amol Mitkari Health Update reacts after viral message of Mitkari having Paralysis Attack)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.