AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या ‘एक दुजे के लिए’ वर शिरसाटांचा टोला, तुमच्यासारखं अकेले हम, अकेले तुम तर नाही ना…

सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, ' सुप्रिया सुळे भाजपच्या संपर्कात कशाला आल्या? एकदा आमचं सरकार बनलं आहे. एकदा अजितदादांनी तो प्रयोग करून झालाय. आता पुन्हा कशाला हे सरकारवर बोलतायत?

Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या 'एक दुजे के लिए' वर शिरसाटांचा टोला, तुमच्यासारखं अकेले हम, अकेले तुम तर नाही ना...
संजय शिरसाट, सुप्रिया सुळे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2022 | 2:16 PM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांचा शपथविधी होऊन महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून राज्य सरकाकरची थट्टा उडवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली. सध्याचं सरकार हे हम बने तुम बने एक दुजे के लिए… असं दोघांसाठी दोघांचच बनलेलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मात्र एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी सुप्रिया सुळे यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. सध्याचं सरकार एक दुजे के लिए असेल तर महाविकास आघाडी सरकारमध्ये अकेले हम, अकेले तुम अशी स्थिती होती. उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकेकट्याने कारभार पाहात होते, मात्र सध्याचं सरकार संगनमतानं काम करतंय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं शिरसाट म्हणाले.

सुप्रिया सुळेंचं वक्तव्य काय?

एकनाथ शिंदे सरकारवर टीका करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्याच खासदाराने सांगितलं. एक दुजे के लिये सरकार आहे. दोनच लोकांचं सरकार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. माझ्याच लोकसभा मतदार संघात काही कामांसाठी पालकमंत्र्यांकडे जातो. प्रशासनाला निर्णय घ्यायला पर्याय नाही. ..

शिरसाटांचं उत्तर काय?

सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ सुप्रिया सुळे भाजपच्या संपर्कात कशाला आल्या? एकदा आमचं सरकार बनलं आहे. एकदा अजितदादांनी तो प्रयोग करून झालाय. आता पुन्हा कशाला हे सरकारवर बोलतायत? राहिला प्रश्न सरकारचा. हे सरकार एक दुजे के लिये तरी आहे. नाही तर याआधीचं सरकार अकेले हम अकेले तुम… उद्धव साहेब एकिकडे, अजितदादा एकिकडे असं होतं. आता एकमेकांच्या भावना समजून घेतायत, तुमच्या भाषेत गळ्याला गळे लावतायत पण काम तर करतायत…’

‘आदित्य ठाकरेंची शिंदेंशी तुलना नको’

आदित्य ठाकरेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ आदित्य ठाकरे यांचा फक्त रोड शो असतो आणि ते शेवटी ठरलेले एक दोन वाक्य बोलून आपलं भाषण संपवतात.. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची आपण व्याप्ती बघू शकता.. लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तुलना होऊ शकत नाही

‘पवारांचा हात धरणारे जेलमध्ये’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ ज्यांनी ज्यांनी शरद पवार यांचा हात हातात धरला आहे ना ते जेल मध्ये गेले आहेत.. त्यांचा हात आत्ता पकडायला लोक घाबरत आहेत. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्यादे होते . संजय राऊत यांचं काम संपलं आहे

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.