गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची धडक, जामनेरमध्ये कार्यालय सुरू

भाजप नेते गिरीश महाजन यांचां मतदारसंघ असलेल्या जामनेर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. (NCP office open in BJP Leader Girish Mahajan dominated Jamner Taluka)

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची धडक, जामनेरमध्ये कार्यालय सुरू

जळगाव : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे परिणाम जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांचां मतदारसंघ असलेल्या जामनेर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, भगवान पाटील यांच्या हस्ते फित कापून तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. (NCP office open in BJP Leader Girish Mahajan dominated Jamner Taluka)

जामनेर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघ असून गेल्या 5 टर्म येथे भाजपची सत्ता आहे. जामनेर शहरात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन कुणी फिरू शकत नव्हतं. मात्र, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पार्टीच्या तालुका कार्यालयाचा बोर्ड लावला आहे. आता आपल्याला जामनेर तालुक्यातील वाईट गोष्टींविरोधात काम करायचे असल्याचे वक्तव्य प्रफुल लोढा यांनी केलं.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यालय सुरु करुन जोरदार सुरुवात केली आहे. जामनेर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीचा बोर्ड लावू शकत नव्हतो मात्र आता लावला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल लोढा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावचे राजकारण बदलण्यास सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगरमध्ये भाजपला आता कार्यालयासाठी जागा शोधावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

भाऊंवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो; एकनाथ खडसेंच्या पत्नीचा टोला

भाजपमध्ये असतो तर वाजपेयी-अडवाणींसारखी माझी अवस्था झाली असती : एकनाथ खडसे

(NCP office open in BJP Leader Girish Mahajan dominated Jamner Taluka)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *