संभाजी भिडेच राष्ट्रवादी चालवतात या वक्तव्यावर मी आजही ठाम : प्रकाश आंबेडकर

अहमदनगर : “शरद पवार हे पुरोगामी, तर त्यांचा पक्ष हा प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी संभाजी भिडे चालवतात या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. आमची आघाडी काँग्रेसबरोबर असून काँग्रेसने कोणाबरोबर जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीला लोक धडा शिकवतील आणि आघाडी झाली तर आम्ही काँग्रेसचा प्रचार करणार असून काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करेल, असा टोला भारिपचे प्रकाश आंबेडकर …

संभाजी भिडेच राष्ट्रवादी चालवतात या वक्तव्यावर मी आजही ठाम : प्रकाश आंबेडकर

अहमदनगर : “शरद पवार हे पुरोगामी, तर त्यांचा पक्ष हा प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी संभाजी भिडे चालवतात या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. आमची आघाडी काँग्रेसबरोबर असून काँग्रेसने कोणाबरोबर जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीला लोक धडा शिकवतील आणि आघाडी झाली तर आम्ही काँग्रेसचा प्रचार करणार असून काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करेल, असा टोला भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय.

“12 जागांवर ठाम”

प्रकाश आंबेडकर यांनी श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत आघाडीतील सहभागावर स्पष्टीकरण देतानाच राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली. आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्याची आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतरच जागा बोलणीची चर्चा करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 12 जागांच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. काँग्रेसनेच त्या जागांबाबत निर्णय घ्यावा, काँग्रेसचा तीन वेळा पराभव झालाय अशा जागा आम्ही मागत आहोत, असंही ते म्हणाले.

चार किंवा सहा जागा अशी आमची मागणी फक्त प्रसार माध्यमात सुरु आहे. जागांविषयी आतापर्यंत आमच्यात कुठलीच चर्चा नाही, मात्र काँग्रेस तीन वेळा ज्या लोकसभा निवडणुका हरली त्या जागांची आमची मागणी आहे. कोणत्या 12 जागा द्यायच्या त्या काँग्रेसनेच ठरवावं, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे. चर्चा पूर्ण झाली नाही तरी आमची 48 जागांवर तयारी पूर्ण झाली असून आघाडी झाली तर वेल अँड गुड, नाही तर आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ, असंही ते म्हणाले.

युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

शिवसेना ही भाजपची प्रेयसी आहे. त्यामुळे प्रेयसीला कसंही वागण्याचा अधिकार आहे. प्रेयसीचं भांडण कधी चांगलं तर कधी बिघडलेलं असतं, पण त्यामुळे संबंध तुटत नाही. मात्र युती झाली तर आम्हाला सर्वाधिक फायदा होणार असून प्रेयसीने आतापर्यंत केलेल्या वक्तव्यांवर प्रियकराला त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि हे भाजपला अडचणीचं ठरेल, असं म्हणत त्यांनी युतीवर निशाणा साधला.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत भारिपच्या कार्यकर्त्यांकडून आरपीआयच्या माजी कार्यकर्त्याला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली होती. पण या मारहाणीचं त्यांनी समर्थन केलंय. हा दलालांना इशारा असल्याचं म्हणत त्यांनी भरशहरात तरुणाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अभय दिलं. प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिल्यामुळे एका तरुणाला मारहाण करण्यात आली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *