AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election 2022 : नागपुरात फडणवीसांचा दबदबा कायम राहणार? वॉर्ड क्रमांक 26 यंदा कुणाचा?

खास करून फडणवीसांची प्रतिष्ठा या ठिकाणी चांगलीच पणाला लागली आहे. तर दुसरीकडून नितीन राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार असे काँग्रेसचे बडे नेते विदर्भातून नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे.

NMC Election 2022 : नागपुरात फडणवीसांचा दबदबा कायम राहणार? वॉर्ड क्रमांक 26 यंदा कुणाचा?
नागपुरात फडणवीसांचा दबदबा कायम राहणार?Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 06, 2022 | 3:24 PM
Share

नागपूर : महापालिका निवडणुकीत Municipal Corporation Election 2022 नागपूर महापालिकेची (NMC Election 2022) गणितं हे नेहमीच बदलत राहिलेली आहेत. विधान परिषद निवडणुकीत नागपुरात भाजपचाच (BJP) दबदबा बघायला मिळाला आहे, मात्र शिक्षक आमदार मतदार संघात नागपूरला बसलेला फटका हेही नागपूरच्या राजकारणाची हवा बदलण्याचं चित्र होतं. त्यामुळे आता भाजपची पकड जरी मजबूत असली तरी भविष्यात ही समीकरणे नागपूर महानगरपालिकेची बदलत राहतील. याबाबत कोणत्याही राजकीय पंडितांना शंका नाही. मात्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना महानगरपालिका त्यांच्या ताब्यात राहणं हे  त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी खास करून फडणवीसांची प्रतिष्ठा या ठिकाणी चांगलीच पणाला लागली आहे. तर दुसरीकडून नितीन राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार असे काँग्रेसचे बडे नेते विदर्भातून नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
काँग्रेस
अपक्ष

मागच्या वेळचं चित्र काय राहिलं?

नागपूर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 26 चे चित्र जर बघितलं तर यात भाजपने इतर राजकीय पक्षांना सहज चितपट केलंय. कारण या वार्डमध्ये चारच्या चार नगरसेवक हे भाजपचेच आहेत. त्यात पहिले उमेदवार धर्मपाल मेश्राम हे विजयी झाले तसेच संगीता अकोले यांनी ही बाजी मारली आहे. तर याच ठिकाणाहून तिसऱ्या उमेदवार मनिषा कोठे या विजय झाल्या आहेत. आणि भाजपचा चौथा उमेदवार जितेंद्र कुकडे यांच्या रूपाने विजय झाला आहे. त्यामुळे एक हाती सत्ता भाजपची या वॉर्डवर राहिलेली आहे. हा वार्ड म्हणजे भाजपसाठी अभेद किल्ला होता जो भेदण्याचं आव्हान काँग्रेससमोर होतं.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

अशी राहिली वॉर्डची व्यप्ती

बगडगंज, छापरुनगर, शास्तत्रीनगर, सतनामीनगर, लकडगंज, क्वेटा कॉलनी, सतरंजीपुरा, स्तमॉल फॅक्री ऐरीआ, जुना बगडगंज, गरोबा मैदान, अशी या वॉर्डची व्यप्ती राहिली आहे. मात्र यावेळी नवे वॉर्ड तयार झाले आहेत. त्यामुळे यात काहीसे बदल होऊ शकतात.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

सध्या तरी भाजपचं पारडं जड

गेल्यावेळी जरी या वॉर्डवरती एक हाती भाजपची सत्ता राहिली असली तरी यावेळी गणितं वेगळी आहेत, कोरोना काळात सर्वच भागाला मोठा फटका बसला आहे, त्याचाही परिणाम निवडणुकीच्या निकालावर होण्याची दाट शक्यता आहे. तसेच इतर राजकीय वाद ही विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्यानंतरही हा वॉर्ड कुणाकडे जातो? हे निवडणुकीचे निकाल सांगतील. मात्र सध्या तरी भजापचं पारडं याठिकाणी जड दिसतंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.