नोटांचा वापर नोटासाठी केला जातोय; भाजपच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर अनिल परब यांची आक्रमक प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब प्रचार संपल्यानंतर जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनिल परब यांनी भाजपच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

नोटांचा वापर नोटासाठी केला जातोय; भाजपच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर अनिल परब यांची आक्रमक प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 8:37 PM

मुंबई : आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोट निवडणुक लागली आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. ऐन वेळी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली. अंधेरी पोट निवडणुकीचा प्रचार आज संपला आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब प्रचार संपल्यानंतर जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनिल परब यांनी भाजपच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

मुरजी पटेलांच्या माघारीनंतर ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी खेळली जात असल्याचा आरोप या व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर केला जात आहे. ठाकरे गटा विरोधात ‘नोटा’च्या बटणाचा प्लॅन बनवला जात असल्याचा दावा या व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर केला जात आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये ‘नोटा’ला मतदान करण्याचं आवाहन केले जात आहे. या ऑडिओ क्लीपमधील आवाज हा मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्याचा असल्याचा दावा केला जात आहे.

या निवडणुकीत काका(मुरजी पटेल) नाही. कमळाचे चिन्ह नाही पण नोटा चे बटन आहे. ‘नोटा’द्वारे रेकॉर्ड मतदान करण्याचं आवाहन या क्लीपमध्ये करण्यात आले आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये लोकांना पैसे देऊ नोटाचे बटण दाबण्यास सांगितले जात आहे. नोटांचा वापर नोटासाठी केला जात असल्याचे अनिल परब म्हणाले.

नोटाचे बटन दाबण्यासाठी मतदारांना नोटा वाटल्या जात असल्याची माहिती आमच्याकडे आली. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रारी देखील केली असल्याचे अनिल परब म्हणाले.

ऋतुजा लटकेंसह सहा उमेद्वार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.