AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation : ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष; मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक, त्रुटी दूर करण्याच्या सूचना

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती भुजबळ यांनी बैठकीनंतर दिली.

OBC Reservation : ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष; मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक, त्रुटी दूर करण्याच्या सूचना
छगन भुजबळ, विजय वडेट्टीवारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 10:10 PM
Share

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन राज्यात महाविकास आघाडी सरकावर भाजपकडून गंभीर आरोप केले जात आहेत. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचा इम्पेरिकल डेटा (Empirical Data) गोळा करण्याची प्रक्रियाच सदोष असल्याचा दावा केलाय. तसंच एकाच आडनावाचे लोक अनेक समाजात असल्यामुळे ओबीसींची संख्या कमी दिसेल, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केलीय. फडणवीसांची ही भीती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मान्य केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती भुजबळ यांनी बैठकीनंतर दिली.

मुख्यमंत्र्यांनी सर्व निट करण्याच्या सूचना दिल्या- भुजबळ

ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये हीच आमची भूमिका आहे. ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करणार असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. इम्पेरिकल डेटा सर्वेक्षण थांबवता येणार नाही. ओबीसींची संख्या आडनावावरुन गोळा केली तर त्रुटी निर्माण होतील याची आम्हाला कल्पना आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व निट करण्याच्या सूचना दिल्यात. मध्य प्रदेशात ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकलं. त्या धर्तीवर आपण करतोय. आपल्याला घाई असल्यानं जनगणना आपण करु शकत नाही, असं भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले.

विरोधी पक्षांसोबत चर्चा करण्याची गरज नाही- वडेट्टीवार

विजय वडेट्टीवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यानुसार इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलंय. आडनावावरुन संख्या ठरत असेल तर गफलत होईल ही बाजू आम्ही मांडली. ओबीसी वास्तविक संख्या निश्चित झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. काम योग्य पद्धतीनेच होईल. तयार होणाऱ्या अहवालावर आमचं बारिक लक्ष आहे. ओबीसी संख्या कमी दाखवण्यासाठी कोणताही दबाव नाही. कुणबी समाज ओबीसी मध्येच दाखवला जाईल. विरोधी पक्षांसोबत चर्चा करण्याची गरज नाही. त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आमच्याकडेही आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

फडणवीसांचा नेमका आक्षेप काय?

‘ओबीसी इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम सुरु आहे. ही पद्धत सदोष आहे. याचा ओबीसींवर खूप मोठा परिणाम होणार आहे. कारण अनेक आडनावं वेगवेगळ्या समाजात असतात. त्यामुळे हा व्यक्ती कुठल्या समाजाचा आहे, हे ठरवावं लागतं. आताच्या सर्वेत ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेला दिसेल. अशी पद्धत सुरु आहे. माझ्याकडे आलेली आकडेवारी मी योग्य वेळी सादर करेल. मी आजच अतिशय स्पष्टपणे सांगतो. सरकार नेहमीच उशीरा जागं होतं. या डेटात अनेक जिल्ह्यांचे ओबीसींच्या लोकसंख्येचे आकडे चूकत आहेत. त्यामुळे ओबीसींची संख्या खूप कमी संख्या सर्वेत दाखवली जाईल. यामुळे ओबीसीवर दुसऱ्याही आरक्षणात अन्याय होईल’ असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.