आतापर्यंत राज्यातील भाजप नेत्यांची मागणी, आता थेट केंद्रीय आरोग्य मंत्रीच म्हणाल्या, ‘उद्धवजी, मंदिरं उघडा!’

आतापर्यंत राज्यातील भाजप नेते मंदिरं उघडण्याची मागणी करत होते. आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीच मुख्यंमंत्र्यांकडे मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.

आतापर्यंत राज्यातील भाजप नेत्यांची मागणी, आता थेट केंद्रीय आरोग्य मंत्रीच म्हणाल्या, 'उद्धवजी, मंदिरं उघडा!'
उद्धव ठाकरे आणि भारती पवार

मुंबई : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जातोय. अशाही परिस्थितीत राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी भाजप करत आहे. आतापर्यंत राज्यातील भाजप नेते मंदिरं उघडण्याची मागणी करत होते. आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीच मुख्यंमंत्र्यांकडे मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.

मंदिरं उघडायला हवीत

महाराष्ट्रात कोविड नियमांचे पालन करून भक्तांसाठी मंदिर उघडायला हवीत. नागरिक नियम पाळत आहे. उद्धवजींनी आता मंदिरं उघडायला हवीत, असं मतं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केली. तसंच ही मागणी करताना त्यांनी वाढलेल्या लसीकरणाचा टक्का देखील अधोरेकित केला.

देशात लसीकरणात 75 कोटींचा आकडा पार केलाय. हे सरकारचे यश आहे. पुढच्या काळात हा आकडा आणखीन वाढेल. देशभरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. त्याचबद्दल डब्लू. एच. ओ. ने कौतुक करणं हा भारताचा गौरव आहे, असंही भारती पवार म्हणाल्या.

तिसरी लाट येऊ नये म्हणून शासनस्तरावर प्रयत्न सुरु

देशात वारंवार तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. याचविषयावर बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या, “तिसरी लाट येऊ नये म्हणून शासनस्तरावर प्रयत्न होतोय. मास्क वापरायला हवा. नागरिकांनी नियम पाळायला हवेत, नागरिकांनी कोरोनाच्या बाबतीत सतर्क राहायला हवे. महाराष्ट्रात कोविड नियमांचे पालन करून मंदिर दर्शनासाठी उघडायला हवी, असं त्या म्हणाल्या.

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं घंटानाद आंदोलन

भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी 29 ऑगस्टला भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आलं. पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद आंदोलन केलं. आंदोलनात ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. मात्र, भाजपने मंदिरं सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे.

देशातल्या कोरोनाची स्थिती काय?

गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 25 हजार 404 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 339 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. विशेष म्हणजे देशभरात काल 75 कोटी लसीकरणाचा टप्पाही पार पडला.

(open the temple Demand Union State minister Bharati Pawar)

हे ही वाचा :

राज्यभरात भाजपचं मंदिरं सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन, ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची घोषणाबाजी

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 25 हजारांच्या घरात, सक्रिय रुग्णसंख्येतही घट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI