AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार, काँग्रेसची भूमिका काय? पहिली प्रतिक्रिया समोर

राज्यात हिंदीच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मुंबईमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे, या मोर्चासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार, काँग्रेसची भूमिका काय? पहिली प्रतिक्रिया समोर
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 2:57 PM
Share

राज्यात हिंदी सक्तीविरोधात वातावरण चांगलंच तापलं आहे, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मुंबईत भव्य मोर्च निघणार आहे. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार  

महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही या आधीच मांडली आहे, जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, जर हे दोन्ही बंधू हिंदी सक्ती विरोधात एकत्र येत असतील तर आम्हाला निश्चितच त्याचा आनंद आहे, आणि या निमित्ताने दोन्ही भावांच्या एकत्रिकरणाचं पुढचं पाऊल टाकलं जात असेल तर आमची भूमिका समर्थनातच आहे, बिना झेंड्याचा बिना बॅनरचा जर मोर्चा असेल आणि हिंदी सक्ती विरोधात सर्व एकत्र येणार असेल आणि दोन्ही भावांनी पुढाकार घेतला असेल तर आमची भूमिका सकारात्मक राहील, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या मोर्चामध्ये काँग्रेसचा सहभाग असेल का? यावर बोलताना वड्डेटीवार यांनी म्हटलं की,  कालच मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता आणि त्यांनी मोर्चात सामील होण्याची विनंती केली आहे, सोबतच राज ठाकरे यांचा ही स्वतंत्र निरोप आहे हेही सांगितलं, त्यामुळे मी माझ्या पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करतो आणि आम्ही भूमिका घेऊ, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

5 जुलैला मोर्चा 

राज्यात हिंदीच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे,  पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक संघटना आणि पक्षांची आहे. याविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या पाच जुलै रोजी मोर्चा निघणार आहे, या मोर्चात राज ठाकरे यांच्यासोबतच उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार आहेत.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?