‘शाब्दिक खेळ करुन शेतकऱ्यांना आधार मिळत नाही’, राजू शेट्टींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. शाब्दिक खेळ करुन शेतकऱ्यांना आधार मिळत नसतो, अशा शब्दात शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

'शाब्दिक खेळ करुन शेतकऱ्यांना आधार मिळत नाही', राजू शेट्टींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
राजू शेट्टी, ऊस परिषद, उस्मानाबाद

उस्मानाबाद : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑक्टोबरमध्ये मदत देण्यात आली आहे. मात्र, या मदतीवरुन शेतकऱ्यांची चेष्टा सुरु असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. शाब्दिक खेळ करुन शेतकऱ्यांना आधार मिळत नसतो, अशा शब्दात शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. (Raju Shetty criticizes CM Uddhav Thackeray for helping farmers)

मुख्यमंत्री शाब्दिक खेळ करतात. शाब्दिक खेळ करुन शेतकऱ्यांना आधार मिळत नसतो. जे द्यायचं ते तात्काळ द्या. सरकारकडे तिजोरीत मदत द्यायला पैसे नसतील तर मंत्र्यांना रोजगार हमी योजनेच्या कामावर पाठवा, असा हल्लाबोल शेट्टी यांनी केलाय. सरकार शेतकऱ्यांना मदत करेल असं वाटत नाही, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. जागर FRP चा, आराधना शक्ती पिठाची, असा नारा देत राजू शेट्टी यांनी उस्मानाबादेतून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आयोजित करण्यात आलीय.

फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

ठाकरे सरकारने जुलै महिन्यातीलअतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत मदतीची घोषणा केली आहे. त्या मदतीवरून भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. वसुली आली की सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा

या सरकारमध्ये चाललेय तरी काय? विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा आहे. मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय. मार्च ते मे 2021 मध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त मदतीची घोषणा केली.

शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?

तसेच नागपूर विभागातील 6 जिल्हे मिळून फक्त 10 कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व 5 जिल्हे मिळून फक्त 1 लाख रुपये! म्हणजे एक जिल्हा फक्त 20 हजार रुपये, अशी जुलै 2021च्या मदतीची घोषणा करण्यात आली होती. शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय.

इतर बातम्या : 

राणे आणि मुख्यमंत्री शेजारी शेजारी बसणार, बातचीत होणार की ‘तुम्ही तिकडे, आम्ही इकडे’?

आर्यन खाननं पार्टीत ड्रग्ज घेतलं होतं की नाही? लाखमोलाच्या सवालाचं NCB च्या पंचनाम्यात उत्तर

Osmanabad Heavy Rain Raju Shetty criticizes CM Uddhav Thackeray for helping farmers

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI