AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिकारी भिंतीवरुन उडी मारुन घरात शिरले, देशाच्या माजी गृहमंत्र्याला अटक

आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांना दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यानतंर सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणावर तातडीने सुनावणीस नकार देत शुक्रवारी सुनावणी ठेवली.

अधिकारी भिंतीवरुन उडी मारुन घरात शिरले, देशाच्या माजी गृहमंत्र्याला अटक
| Edited By: | Updated on: Aug 21, 2019 | 10:01 PM
Share

नवी दिल्ली : दोन तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram arrested) यांना अटक करण्यात आली. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने चिदंबरम (P Chidambaram arrested) यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांना दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यानतंर सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणावर तातडीने सुनावणीस नकार देत शुक्रवारी सुनावणी ठेवली.

पी चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. दहा मिनिटात निवेदन देऊन चिदंबरम यांच्या घराकडे जाण्यासाठी निघाले. त्यातच सीबीआयची टीम काँग्रेस मुख्यालयात दाखल झाली. पण तोपर्यंत चिदंबरम निघून गेले होते.

वाचा दिग्गजांना घाम फोडणारी ईडी नेमकी आहे तरी काय?

यानंतर सीबीआय टीमने चिदंबरम यांचा पाठलाग करत त्यांचं घर गाठलं. पण तिथे गेल्यानंतर सीबीआय टीमला अडवण्यात आलं. सुरक्षा रक्षकांनी गेट उघडण्यास नकार दिला. गेट न उघडल्यामुळे सीबीआय टीमने भिंतीवरुन उडी मारत घरात प्रवेश केला.

सीबीआयनंतर काही मिनिटातच ईडीचीही टीम दाखल झाली. ईडीच्या टीमसाठी गेट उघडण्यात आलं. जमाव वाढलेला पाहता दिल्ली पोलीसही दाखल झाले.

वाचा – गृहमंत्रीपद आणि सीबीआय… फक्त मंत्री बदलले

दोन तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पी चिंदबरम यांना अखेर ताब्यात घेण्यात आलं. त्यांना घराच्या बाहेर आणल्यानंतर कार्यकर्ते गाडीला आडवे झाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवलं आणि चिदंबरम यांना चौकशीसाठी घेऊन गेले.

आयएनएक्स मीडिया प्रकरण

आयएनएक्स मीडियाला FIPB- परकीय गुंतवणूक प्रमोशन मंडळ (Foreign Investment Promotion Board) कडून बेकायदेशीर पद्धतीने परवानगी मिळवून देण्यासाठी पी चिदंबरम यांनी 305 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चिदंबरम यांना कोर्टाकडून आतापर्यंत जवळपास 24 वेळा अंतरिम जामीन मिळाला आहे. 2007 मध्ये चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना यापूर्वीच अटक केली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. शीना बोरा हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सरकारी साक्षीदार होण्यास होकार दिल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं.

2017 मध्ये सीबीआयने परकीय गुंतवणूक प्रमोशन मंडळात आढळून आलेल्या बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. तर ईडीने 2018 मध्ये पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आयएनएक्स मीडियाची मालकीण इंद्राणी मुखर्जीला साक्षीदार करण्यात आलं आणि जबाबही नोंदवण्यात आला. कार्ती चिदंबरम यांना 10 लाख रुपये दिल्याचं इंद्राणी मुखर्जीने कबूल केल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....