Palghar ZP Election : झेडपी, पंचायत समितीच्या मतदानासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज

पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 29 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी 626 मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे.

Palghar ZP Election : झेडपी, पंचायत समितीच्या मतदानासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज
Palghar-ZP-Election
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 6:34 PM

पालघर : पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 29 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी 626 मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 3 हजार 455 अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. (Palghar District administration ready for voting)

जिल्हा परिषदेचे विविध 15 गट व पंचायत समितीचे 14 गण यांच्या मतदानासाठी प्रशासनामार्फत विविध साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. ईव्हीएम मशीन आणि इतर बाबींसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. काही ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झाले असून काही ठिकाणी सुरू आहे. गट व गणाच्या निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या प्रांत अधिकाऱ्यांसह तहसीलदार व निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मतदान केंद्रसाठी आढावा घेतला जात आहे. ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तालुकास्तरीय कार्यालय ठेवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने तेथे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी व साहित्य वितरित करण्यासाठी मंडप बांधण्याचे काम जोरदार सुरू आहे. याचबरोबरीने मतमोजणी करण्यासाठीही या ठिकाणी विशेष सुरक्षेसह कक्षाची तयारी केली जात आहे.

प्रत्येक अधिकारी वर्गाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली जबाबदारी या अनुषंगाने मतदानाची पूर्वतयारी सुरू करण्यात आलेली आहे. तालुकास्तरीय मतदान केंद्र अधिकारी यांच्यामार्फत गण व गटात मतपत्रिका वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नागरिकांना मतपत्रिका वाटप केले जात असल्याचे तालुका कार्यालयांमार्फत सांगण्यात आले आहे. तसेच मतदार यादी मतदानासाठी तयार केल्या गेल्या आहेत.

निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी समिती

मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर वाढला असला तरी या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासह निवडणूक आचारसंहिता प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीमार्फत विविध नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारीवर्गा मार्फत छायाचित्रीकरण करणे, देखरेख ठेवणे, फिरती पथके अशी कामे करण्यात येत आहेत.

मतदान केंद्रांवर कोरोना नियमांचे पालन

पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 15 गट व पंचायत समितीचे 14 गण मिळून 3 लाख 67 हजार 602 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 80 हजार 915 स्त्रिया तर 1 लाख 86 हजार 693 पुरुष मतदार आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये केंद्रप्रमुख यांच्यासह अधिकारी वर्ग, शिपाई यांची तरतूद केलेली आहे. त्याचबरोबरीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्रत्येक केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हाताचे निर्जंतुकीकरण त्याचबरोबरीने तोंडाला मूखपट्टी लावणे असे जनजागृतीपर संदेशही प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहेत. त्या दृष्टीने नागरिकांनीही मतदानाची नैतिक जबाबदारी पार पाडताना कोरोना संबंधातील उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.

सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ईव्हीएम मतदान यंत्रांची बिघाड होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच प्रत्येक केंद्रांवर अतिरिक्त यंत्रे दिली जाणार आहेत.

मतदान करणारे एकूण मतदार : 3, 67, 612

महिला मतदार: 1, 80, 915

पुरुष मतदार: 1, 86, 693

मतदार व मतदान केंद्र संख्या

तालुकानिहाय मतदार, केंद्र संख्या, गट व गणांची संख्या (अनुक्रमे)

तलासरी – 15985 – 27 – 1 – 0 डहाणू – 84434 – 142 – 4 – 2 विक्रमगड – 16922 – 30 – 1 – 0 मोखाडा – 29579 – 54 – 2 – 0 वाडा – 96709 – 170 – 5 – 1 पालघर – 108640 – 175 – 2 – 9 वसई – 15343 – 28 – 0 – 2

इतर बातम्या :

परमबीर सिंग नेमके गेले कुठे? विदेशात पळून गेले? ठाणे पोलीसांची लूक आऊट नोटीस जारी

जयंत पाटलांकडून फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण! तज्ज्ञांच्या मतावर बोलणं टाळलं

Palghar District administration ready for voting

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.