5

पालघर झेडपी आणि पंचायत समिती पोटनिवडणूक; उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, कशी आहे राजकीय स्थिती?

पालघर जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीच्या पोट निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालीय. निवडणुकांची रणधुमाळीला आज पासून सुरू होणार आहे. आज पासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता असल्याने सध्या तरी या निवडणुकीचा विशेष काही प्रभाव पडेल असं वाटत नाही.

पालघर झेडपी आणि पंचायत समिती पोटनिवडणूक; उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, कशी आहे राजकीय स्थिती?
पालघर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 3:00 PM

पालघर : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशा स्थितीत राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अशावेळी पालघर जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीच्या पोट निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालीय. निवडणुकांची रणधुमाळीला आज पासून सुरू होणार आहे. आज पासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता असल्याने सध्या तरी या निवडणुकीचा विशेष काही प्रभाव पडेल असं वाटत नाही. मात्र तरीही आपलं संख्याबळ टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप असा सामना पालघरमध्ये पाहायला मिळणार आहे. (Palghar Zilla Parishad and Panchayat Samiti elections)

पालघर जिल्हापरिषदेत 57 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 18, राष्ट्रवादी 17, भाजप 12, माकप 5, बहुजन विकास आघाडी 4, तर काँग्रेसचा एक असे सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष मिळून बहुमताचा आकडा पार करत महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषदेतील 15 सदस्य, तर पालघर, डहाणू, वाडा आणि वसई या चार पंचायत समिती मधील 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं होतं.

पालघर जिल्हा परिषेदेवरील 15 जणांचे सदस्यत्व रद्द

जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17 सदस्यांपैकी 8, शिवसेनेच्या 18 सदस्यांपैकी 3, भाजपच्या 12 सदस्यांपैकी 3 तर माकपच्या 5 सदस्यांपैकी 1, अशा एकूण 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. 57 सदस्यांपैकी 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने उर्वरित 42 सदस्यसंख्येमुळे बहुमताचा झालेला 22 हा आकडा गाठण्यात महाविकास आघाडीला कुठलीही अडचण निर्माण झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपदी शिवसेनेच्या वैदेही वाढाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सांबरे ह्यांची निवड झालेली आहे.

सदयत्व रद्द झालेले तालुका निहाय सदस्य

1. तलासरी तालुक्यातील उधवा गटातून निवडून आलेले प्रवीण दवणेकर (सिपीएम)

2. डहाणू तालुक्यातील बोर्डी गटातून निवडून आलेल्या ज्योती पाटील(राष्ट्रवादी). कासा गटातून निवडून आलेल्या जयश्री केणी (राष्ट्रवादी). सरावली गटातून निवडून आलेल्या सुनील माच्छी(भाजप). वनई गटातून निवडून आलेले सभापती सुशील चुरी(शिवसेना)

3. विक्रमगड तालुक्यातील आलोंडे गटातून निवडून आलेले उपाध्यक्ष निलेश सांबरे(अपक्ष-राष्ट्रवादी)

4. मोखाडा तालुक्यातील आसे गटातून निवडून आलेले हबीब शेख (राष्ट्रवादी), पोशेरा गटातून निवडून आलेल्या राखी चोथे (भाजप)

5. वाडा तालुक्यातील गारगाव गटातून निवडून आलेल्या रोहिणी शेलार (राष्ट्रवादी), मोज गटातून निवडून आलेल्या अनुष्का ठाकरे (शिवसेना), मांडा गटातून निवडून आलेल्या अक्षता चौधरी (राष्ट्रवादी), पालसई गटातून निवडून आलेले शशिकांत पाटील (राष्ट्रवादी), तर अबिटघर गटातून निवडून आलेले नरेश आकरे (राष्ट्रवादी)

6. पालघर तालुक्यातील सावरे-एबूर गटातून निवडून आलेल्या विनया पाटील (शिवसेना), तर नंडोरे देवखोप गटातून निवडून आलेल्या अनुश्री पाटील (भाजप),

अशा 15 सदस्यांना ह्याचा फटका बसला असून त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आता रद्द करण्यात आलेलं आहे.

इतर बातम्या :

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित, खटला चालवला जाणार

किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार टोला

Palghar Zilla Parishad and Panchayat Samiti elections

Non Stop LIVE Update
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?