AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूर पोटनिवडणुकीत धक्क्यावर धक्के, भाजप उमेदवाराविरुद्ध चुलतभावाचा अर्ज, तब्बल 39 जण रिंगणात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपला उमेदवार देऊन राष्ट्रवादीसमोर आव्हान उभं केलंय. तर दुसरीकडे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या चुलत भावानेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत धक्क्यावर धक्के, भाजप उमेदवाराविरुद्ध चुलतभावाचा अर्ज, तब्बल 39 जण रिंगणात
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या चुलत भावाचाही उमेदवारी अर्ज
| Updated on: Mar 30, 2021 | 7:24 PM
Share

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असताना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसमोर एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपला उमेदवार देऊन राष्ट्रवादीसमोर आव्हान उभं केलंय. तर दुसरीकडे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या चुलत भावानेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (BJP candidate Samadhan Avtade’s cousin Siddheshwar Avtade’s candidature application)

भाजप उमेदवार घरातील बंड कसं रोखणार?

पंढरपूरच्या रिंगणात भाजपनं समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. तर अन्य उमेदवार मिळून तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नगराध्यक्षांच्या पतीनेही भरला अर्ज

पंढरपूरच्या भाजप पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोन उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नेते हे पक्षांतर्गत बंड कसं थंड करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

स्वाभीमानीमुळे राष्ट्रवादीची अडचण!

पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत आज स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

>> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

संबंधित बातम्या :

जयंत पाटील म्हणाले, फडणवीस पंढरपुरातील उमेदवार मागे घेतील, आता दरेकरांचं मोठं वक्तव्य

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उडी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढणार?

BJP candidate Samadhan Avtade’s cousin Siddheshwar Avtade’s candidature application

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.