गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला पंकजांचे घरातूनच सहकुटुंब अभिवादन, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना मानवंदना (Gopinath Munde Death Anniversary) दिली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:46 PM, 3 Jun 2020
गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला पंकजांचे घरातूनच सहकुटुंब अभिवादन, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना मानवंदना  दिली. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घरातूनच सहकुटुंब त्यांना अभिवादन केले. तर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन काकांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. (Gopinath Munde Death Anniversary)

पंकजा मुंडे यांनी मुंबईतील घरातूनच सहकुटुंब गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आधी पंकजा यांनी परळीला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली विनंती मान्य करुन त्यांनी परळी दौरा रद्द केला.

पंकजा मुंडे यांची धाकटी भगिनी आणि भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले.

परळीचे आमदार धनंजय मुंडेही बीडमध्ये असल्याने ते गोपीनाथ गडावर गेले होते. “लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीदिनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. आप्पा, तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी अविरत पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द आहे. सदैव तुमच्या आठवणीत” असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं (Gopinath Munde Death Anniversary) आहे.

संबंधित बातम्या :

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान, गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको : पंकजा मुंडे