AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘परळी सुन्न, राज्याची मान खाली गेली’, पंकजा मुंडेंचं ट्वीट; तर करुणा शर्मांच्या समर्थनात बीड भाजप मैदानात उतरणार

करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीड भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल टाकण्यातं आलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय.

'परळी सुन्न, राज्याची मान खाली गेली', पंकजा मुंडेंचं ट्वीट; तर करुणा शर्मांच्या समर्थनात बीड भाजप मैदानात उतरणार
करुणा शर्मा
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 2:46 PM
Share

बीड : जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचं मत बीड भाजपनं व्यक्त केलंय. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीड भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल टाकण्यातं आलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. इतकंच नाही तर या प्रकरणात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत राज्याची मान खाली गेल्याची खंत व्यक्त केलीय. (Pankaja Munde’s tweet in Karuna Sharma case, criticism on Dhananjay Munde)

“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !!”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केलंय. याद्वारे पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.

करुणा शर्मांच्या समर्थनात भाजप मैदानात उतरणार

दुसरीकडे करुणा शर्मांच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरणार आहे, तशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. करुणा शर्मा यांच्यावर अन्याय झालाय. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी भाजपकडून करण्यात आलीय. तसंच करुणा शर्मा यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय.

नेमकं काय घडलं?

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

व्हायरल व्हिडीओत काय?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

इतर बातम्या :

पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या मदतीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा पुढाकार, 1 हजार मुलींना आर्थिक सहकार्य

VIDEO : शार्दूलने ओव्हलवरील दमदार कामगिरी मागील गुपित सांगितले, विजयानंतर लॉर्ड ठाकूरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

Pankaja Munde’s tweet in Karuna Sharma case, criticism on Dhananjay Munde

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.