पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या मदतीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा पुढाकार, 1 हजार मुलींना आर्थिक सहकार्य

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. पूरग्रस्त कुटुंबातील मुलींसाठी दीपाली सय्यद यांनी 5 कोटी रुपयांचा निधी देऊ केलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये 1 हजार मुलींना मुदत ठेव पावतीचं वाटप केलं जाणार आहे.

पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या मदतीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा पुढाकार, 1 हजार मुलींना आर्थिक सहकार्य
अभिनेत्री दीपाली सय्यद
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 2:19 PM

सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुरानं थैमान घातल्यानंतर अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडली आहेत. अशावेळी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. पूरग्रस्त कुटुंबातील मुलींसाठी दीपाली सय्यद यांनी 5 कोटी रुपयांचा निधी देऊ केलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये 1 हजार मुलींना मुदत ठेव पावतीचं वाटप केलं जाणार आहे. दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरातील जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात पूरस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. (5 crore assistance from Deepali Syed for girls in flood affected area in sangli)

दीपाली सय्यद यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील 1 हजार पूरग्रस्त मुलींच्या नावावर प्रत्येकी 50 हजार रुपयांची मुदत ठेव जमा करत आहेत. त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी द्या देत आहेत. 9 सप्टेंबर रोजी सांगलीच्या कवठेपिराण इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत 1 हजार मुलींना ठेव पावतीचं वितरण केलं जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावणार असल्याचं कळतंय. यावेळी सर्वपक्षीय नेतेही व्यासपीठावर असतील, अशी माहिती दीपाली सय्यद यांनी दिली आहे.

भुदरगड तालुक्यात पूरस्थितीची पाहणी, 10 कोटीचा निधी

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी 28 जुलै रोजी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. तेव्हा बोलताना सय्यद म्हणाल्या की, “भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षापूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. मी हे चित्र डोळ्याने बघितलं आहे. काहीच उरलं नाहीय. दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय”

कोण आहे दीपाली सय्यद?

>> दीपाली सय्यद यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. >> राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मुंब्रा-कळवा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला >> दीपाली सय्यद यांनी साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी उपोषण केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. >> दीपाली सय्यद या अभिनेत्री म्हणून परिचीत आहेत >> अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि रिअलिटी शोमध्ये दीपाली सय्यद दिसल्या होत्या. >> दीपाली सय्यद यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आपकडून निवडणूक लढवली होती. >> त्या निवडणुकीत दीपाली सय्यद यांचा पराभव झाला होता. >> दीपाली सय्यद यांनी आप सोडून विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेते प्रवेश केला होता >> गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद सामाजिक कार्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. >> 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता.

इतर बातम्या :

सहकार क्षेत्र संपवण्याचं केंद्राचं षडयंत्र; आरबीआयच्या नव्या धोरणाला शरद पवारांचा कडाडून विरोध

Marathwada Weather Update: मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार, ऑरेंज ॲलर्ट जारी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

5 crore assistance from Deepali Syed for girls in flood affected area in sangli

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.