VIDEO : शार्दूलने ओव्हलवरील दमदार कामगिरी मागील गुपित सांगितले, विजयानंतर लॉर्ड ठाकूरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

शार्दूल ठाकूरने ओव्हल कसोटीत गोलंदाजीसह फलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. आता तो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत एकाच कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतक ठोकणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे.

VIDEO : शार्दूलने ओव्हलवरील दमदार कामगिरी मागील गुपित सांगितले, विजयानंतर लॉर्ड ठाकूरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
शार्दूल ठाकूर (सौजन्य-BCCI)
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 2:13 PM

लंडन : मागील काही काळात जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या अप्रतिम खेळामुळे सोशल मीडियावर फॅन्सकडून ‘लॉर्ड’ ही उपमा मिळालेल्या शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) चौथ्या कसोटीत अप्रतिम कामगिरी केली. भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket team) ओव्हलच्या मैदानावरील (Oval Test)  विजयाच शार्दूलने मोठा वाटा उचलला. सामन्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया देताना या कामगिरी मागील गुपित सागितलं.

पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यात संधी न मिळालेल्या शार्दूलने चौथ्या कसोटीत मात्र आपल्या कामगिरीने सर्वांनाच आपण कोण आहोत. हे दाखवून दिले. शार्दूलने चौथ्या कसोटीत दोन्ही डावात आठव्या स्थानावर येत अर्धशतक झळकावले. तर अत्यंत महत्त्वाचे असे तीन विकेटही घेतले. त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावरच बोलताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘आधीच ठरवलं होत सामन्यात छाप सोडायची आहे.’

सामन्यानंतर बोलताना शार्दूल ठाकूर म्हणाला, ”ज्या दिवशी मला कळालं मी सामन्यात खेळत आहे. तेव्हाच मी ठरवलं मला दमदार कामगिरी करुन स्वत:ची छाप सोडायची आहे. तसंच संघाला विजय मिळवून देण्यात मोठं योगदान द्यायचं होतं. या सगळ्यात प्रशिक्षकांच्या शिकवणीमुळे मी गोलंदाजीसह फलंदाजीतही खास कामगिरी करु शकलो.”

काय केलं होत शार्दूलने चौथ्या कसोटीत?

ओव्हलवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात शार्दूल दोन सामन्यांनंतर खेळायला उतरला. पहिल्या डावात भारताचा स्कोअर होता 117 धावांवर सहा विकेट. अशा स्थितीत शार्दूल खेळायला उतरला आणि तो भारताला 191 पर्यंत घेऊन गेला. पहिल्या डावात शार्दूलनं 36 बॉल्समध्ये शानदार 57 रन्स ठोकल्या. यात त्यानं 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

एवढच नाही तर दुसऱ्या डावातही शार्दूलनं कमाल केली. विशेष म्हणजे पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात शार्दूलनं मोठी जबाबदारी निभावली. दुसऱ्या डावात भारतानं 312 रन्सवर सहा विकेट गमावल्या त्यावेळेस शार्दूल मैदानात उतरला. टीम इंडियाकडे 211 धावांची आघाडी होती. त्यानंतर शार्दूलनं ऋषभ पंतसोबत 100 धावांची महत्वाची भागीदारी करत टीम इंडियाची आघाडी 300 पार पोहोचवली. शार्दूलच्याच खेळाच्या जोरावर टीम इंडिया इंग्लंडसमोर 368 धावाचं आव्हान उभं करु शकली. शार्दूलने दुसऱ्या डावात 72 चेंडूत 60 धावांची महत्वाची खेळी खेळली.

फलंदाजीत शार्दुल चमकलाच, त्यासोबत त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्याला केवळ एकच बळी मिळवता आला होता. दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरु केली होती. सलामीवीर हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी सलामीसाठी शतकी (100) भागीदारी केली. परंतु लार्ड शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने बर्न्सचा 50 धावांवर असताना काटा काढला. त्यानंतर या मालिकेत सातत्याने भारतीय गोलंदाजांची पिसं काढणारा कर्णधार जो रुट मात्र या डावातही खेळपट्टीला चिकटला होता. मात्र पुन्हा एकदा लॉर्ड शार्दुलने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याने रुटला त्रिफळाचित करत भारताचा विजय पक्का केला. या कामगिरीमुळेच त्याला सामनावीर मिळायला हवं होतं असा प्रतिक्रिया उमटत आहेत.

इतर बातम्या

IND vs ENG: सामनावीर पुरस्कार मिळूनही रोहित म्हणतो खरा हिरो तर ‘हा’ खेळाडू, ओव्हल कसोटीनंतर रोहित शर्माच मत

IND vs ENG: बुमराहला अप्रतिम कामगिरीचं फळ, ICC च्या खास पुरस्कारासाठी नामांकित

Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?

(I played to make impact on game says lord shardul thakur after india vs england oval test)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.