AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही निवडून दिलं नसतं तर मी आत्महत्या…. आमदार रत्नाकर गुट्टेंचं भावनिक विधान, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ!

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक केल्या प्रकरणी गंगाखेड शुगरचे चेअरमन तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे तुरुंगात होते.

तुम्ही निवडून दिलं नसतं तर मी आत्महत्या.... आमदार रत्नाकर गुट्टेंचं भावनिक विधान, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 02, 2023 | 3:45 PM
Share

नजीर खान, परभणी : तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला जीवदान मिळालं नाही तर मी आत्महत्या केली असती, असं भावनिक विधान एका आमदाराने केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. परभणीतील रासप (RSP) आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी हे वक्तव्य केलंय. पूर्णा येथे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. 2019 मधील विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीच्या वेळी त्यांची काय मनःस्थिती होती, हे यावेळी त्यांनी सांगितलं.

आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात रासपच्या वतीने 2019 मध्ये निवडणूक लढले. या निवडणुकीच्या आधीच ते तुरुंगात होते. शेतकऱ्यांच्या नावावरील कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होता. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 2019ची निवडणूक त्यांनी तुरुंगातूनच लढली होती.

त्यावेळची मनःस्थिती त्यांनी आज एका कार्यक्रमात बोलून दाखवली. रत्नाकर गुट्टे म्हणाले, ‘ माझे भाऊ, बहीण सगळे तुम्ही आहात. एका परिवाराप्रमाणे. माझं जगणं-मरणं जे काही आहे, ते या परिवारासाठी आहे. तुम्ही मला जीवदान दिलंय. निवडणुकीत हरलो असतो तर मला आत्महत्या करावी लागली असती.

मी खोटं कधी बोलत नाही. बोलणार नाही. तुम्ही निवडून दिलं म्हणून मी बोनस जगतोय. त्यामुळे हे सर्व तुमच्यासाठी आहे… असं वक्तव्य आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलंय.

2019 मध्ये जेलमधून निवडणूक जिंकले

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक केल्या प्रकरणी गंगाखेड शुगरचे चेअरमन तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे तुरुंगात होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन नाकारला असतानाही त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

रत्नाकर गुट्टे हे रासपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. 2019 मध्ये महायुतीत ही जागा शिवसेनेसाठी सुटली होती. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यानंतर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवर टीका करत रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला जवळपास 18 हजार मतांनी पराभूत केलं.

शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.