नाथ्रा गावाने पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची साथ सोडली

नाथ्रा गावात कायमच धनंजय मुंडेंचं वर्चस्व राहिलंय. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा गावकऱ्यांनी धनंजय मुंडेंच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला.

नाथ्रा गावाने पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची साथ सोडली

बीड : राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे (Parli Vidhansabha Result Live) यांनी मोठी आघाडी घेतली. सुरुवातीच्या तीन फेऱ्यांअखोर धनंजय मुंडेंना 3506 मतांची आघाडी होती. विशेष म्हणजे त्यांचं मूळ गाव नाथ्रामध्येही (Parli Vidhansabha Result Live) राष्ट्रवादीला 350 मतांची आघाडी मिळाली. नाथ्रा गावात कायमच धनंजय मुंडेंचं वर्चस्व राहिलंय. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा गावकऱ्यांनी धनंजय मुंडेंच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला.

कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक धाकधूक वाढवणारी ठरली आहे. कारण, पहिल्या फेरीपासूनच धनंजय मुंडेंनी घेतलेली आघाडी कमी झाली नाही. या बहिण-भावामध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठा वाद उफाळून आला होता. दोन्ही नेत्यांकडून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. पण पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये धनंजय मुंडेंनी आघाडी घेतली. गोपीनाथ गड असलेल्या पांगरी गावातही धनंजय मुंडेंनी 800 मतांची आघाडी घेतली.

दरम्यान, परळीत अजूनही मतमोजणी सुरु असून उर्वरित टप्प्यांचे कलही लवकरच समोर येतील. धनंजय मुंडेंची आघाडी अशीच वाढत राहिल्यास पंकजांसाठी हा मोठा धक्का असेल. कारण, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी डॉ. प्रीतम मुंडे यांना साथ दिली होती. त्याच आत्मविश्वासावर पंकजा मुंडेंनी विजयाचा दावा केला होता. पण विधानसभेला सुरुवातीच्या कलांनुसार निकाल बदललेले दिसत आहेत.

LIVE : निकाल लाईव्ह पाहा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *