छोट्या भावाकडून 2 कोटी घेतले, आत्या-आजोबांना 70 लाख दिले, पार्थची संपत्ती किती?

छोट्या भावाकडून 2 कोटी घेतले, आत्या-आजोबांना 70 लाख दिले, पार्थची संपत्ती किती?

पुणे: लोकसभा निवडणुकीकरता जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्याचं लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांनी आपले अर्ज मंगळवारी दाखल केले. या दोघांनी आपल्या अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा तपशील दिला आहे. 29 वर्षीय पार्थ पवार यांनी स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून जवळपास 20 कोटी रुपये संपत्ती जाहीर केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे पार्थ यांच्यावर 9 कोटी रुपयांचं कर्ज आहे, ते सुद्धा आई आणि भावाकडून घेतलेलं आहे. तर आत्या सुप्रिया सुळे आणि आजोबा शरद पवार यांना पार्थने पैसे दिले आहेत.

पार्थ पवार यांची संपत्ती किती?

पार्थ पवार यांनी आपण शेती आणि व्यवसाय करत असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत शेती आहे. शेती, जमीन आणि इतर ठेवींसह पार्थ पवार यांची संपत्ती जवळपास 20 कोटींवर जाते.

पार्थ पवार यांच्याकडे काय काय?

पार्थ पवार यांच्याकडे 3 कोटी 69 लाख 54 हजार 163 रुपयांची जंगम अर्थात पैसे, दागदागिने, गाड्या यांच्या स्वरुपात संपत्ती आहे.

तर त्यांच्याकडे 16 कोटी 42 लाख 85 हजार 170 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये घर, जमीन यांचा समावेश होतो.

पार्थ पवार यांच्याकडे रोख रक्कम 3 लाख 67 हजार 83 रुपये आहेत. त्याशिवाय बँकातील ठेवी, शेअर्स असे मिळून ते सर्व 3 कोटी 69 लाखांवर पोहोचतं.

पार्थ पवार यांच्यावर किती कर्ज?

पार्थ पवार यांच्यावर 9 कोटी 36 लाख 13 हजार 295 रुपयांचं कर्ज आहे. त्यापैकी 7 कोटी 13 लाख 13 हजार 295 रुपये आई सुनेत्रा पवार यांच्याकडून, तर भाऊ जय पवार यांच्याकडून 2 कोटी 23 लाख रुपये घेतले आहेत.

पदवीधर पार्थ अविवाहित

पार्थ पवार यांनी आपण अविवाहित असल्याचं म्हटलं आहे. पार्थ यांनी बीकॉमची पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठातून एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली आहे.

पार्थ पवार यांच्याकडे वाहने कोणती?

पार्थ पवार यांनी आपल्याकडे साडेनऊ लाखांची वाहने असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये –

  • ट्रॅक्टर – 7 लाख 65 हजार
  • मोटर सायकल – 13 हजार 144
  • ट्रेलर – 1 लाख 53 हजार 400

शरद पवार-सुप्रियांना पैसे दिले

पार्थ पवार यांनी आजोबा शरद पवार यांना 50 लाख रुपये दिले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी आत्या सुप्रिया सुळे यांनाही 20 लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे.

संबंधित बातम्या 

दहावी नापास श्रीरंग बारणे अब्जाधीश, संपत्ती पाहून तुम्हीही थक्क व्हाल!  

विखे पाटील आणि मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या तारखा ठरल्या!   

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI