PCMC election 2022 : राष्ट्रवादी आणि भाजपातल्या अटीतटीच्या लढतीचा प्रभाग क्रमांक 12; विजयाची परंपरा राखणार राष्ट्रवादी?

2017ला याठिकाणी नगरसेवकांच्या चारही पॅनलमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. अर्थात राष्ट्रवादीनंतर भाजपाचे याठिकाणी वर्चस्व दिसून आले होते. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये खूप जास्त अंतर नव्हते.

PCMC election 2022 : राष्ट्रवादी आणि भाजपातल्या अटीतटीच्या लढतीचा प्रभाग क्रमांक 12; विजयाची परंपरा राखणार राष्ट्रवादी?
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वॉर्ड 12Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 7:30 AM

पुणे : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत (PCMC election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. यावेळी तीन उमेदवारांचे पॅनल असणार आहे, जे मागील वेळी चार होते. म्हणजेच एका प्रभागात अ, ब, क असे तीन विभाग असतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. मागील वेळी राष्ट्रवादी आणि भाजपा (BJP) या दोघांमध्ये चांगलीच टक्कर रंगली होती. थोड्या फरकाने प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीनेच (NCP) बाजी मारली. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे.

प्रभागातील व्याप्ती आणि महत्त्वाची ठिकाणे?

घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती अशी प्रभाग 12ची व्याप्ती आहे. महादेव गोपाळ शिवरकर रस्ता, साने चौक चिखली, देहू-आळंदी रस्ता, सावतामाळी रस्ता, छत्रपती शिवाजी संभाजी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, व्हिनस हॉस्पिटल जाधव सरकार चौकापर्यंत, स्पाईन रस्ता, आनंदघन वृद्धाश्रम, कुदळवाडी इंडस्ट्रीयल रस्ता आदी.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 12मध्ये एकूण लोकसंख्या 34,418 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3869 तर अनुसूचित जमातीतील लोकसंख्या 533 इतकी आहे. 2021ला जनगणना झालेली नाही. त्यामुळे पूर्वीच्या लोकसंख्येत आताची संख्या साधारणपणे 10 टक्के गृहीत धरण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

विजय कुणाचा?

2017ला याठिकाणी नगरसेवकांच्या चारही पॅनलमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. अर्थात राष्ट्रवादीनंतर भाजपाचे याठिकाणी वर्चस्व दिसून आले होते. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये खूप जास्त अंतर नव्हते. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपाही प्रयत्नशील असणार आहे.

विजयी उमेदवार (2017)

12 (A) भालेकर प्रवीण महादेव

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनानरळे सुखदेव ज्ञानु--
भाजपाम्हेत्रे सुरेश रंगनाथ--
काँग्रेस----
राष्ट्रवादीभालेकर प्रवीण महादेवभालेकर प्रवीण महादेव
मनसे----
इतर----
12 (B) पौर्णिमा रवींद्र (अप्पा) सोनवणे

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाभालेकर आशा दयानंद--
भाजपावर्णेकर शितल धनंजय--
काँग्रेस----
राष्ट्रवादीपौर्णिमा रवींद्र सोनवणेपौर्णिमा रवींद्र सोनवणे
मनसे----
इतर----
12 (C) संगीता (नानी) प्रभाकर ताम्हाणे

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाजाधव विजया अशोक--
भाजपाभालेकर अरुणा दिलीप--
काँग्रेस----
राष्ट्रवादीसंगीता (नानी) प्रभाकर ताम्हाणेसंगीता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
मनसेबोराटे नयना कुलदीप--
इतर----
12 (D) पंकज दत्तात्रय भालेकर

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनागोरखनाथ फक्कड कदम--
भाजपाभालेकर शांताराम कोंडिबा--
काँग्रेसशेख मकबूल इब्राहिम--
राष्ट्रवादीपंकज दत्तात्रय भालेकरपंकज दत्तात्रय भालेकर
मनसे----
इतर----

आरक्षण कसे?

महापालिकेतील आरक्षण यावेळी बदलले आहे. प्रभाग 12 अ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे. 12 ब देखील सर्वसाधारण महिलेकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. आणि 12 क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी ठेवण्यात आला आहे.

'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.