AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीच्या अपयशाला नरेंद्र मोदी आणि शाह जबाबदार; मनसे नेत्याच्या विधानाने खळबळ

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात महायुतीचा मोठा पराभव झाला आहे. तर तुलनेने महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा महायुतीचा दावा फेल गेला आहे. त्यामुळे आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

महायुतीच्या अपयशाला नरेंद्र मोदी आणि शाह जबाबदार; मनसे नेत्याच्या विधानाने खळबळ
pm modi Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 13, 2024 | 3:39 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड अपयश मिळालं आहे. त्यानंतर आता टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबतचं मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी थेट भूमिका जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसेच्या या भूमिकेवर महायुतीचे नेते काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. लोकसभेत आमचा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी होता. बाकी महायुतीतल्या इतर पक्षाशी आमचा सबंध नाही. लोकसभे निवडणुकीत महायुतीला जे अपयश मिळालं आहे, त्याला फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी, अमित शाह जबाबदार आहेत. मोदी आणि शाह यांनी काही टोकाच्या भूमिका घेतल्या. त्या जनतेला पटल्या नाहीत, असं सांगतानाच अजित पवार यांना सोबत घेण्याचा फटका महायुतीला बसला आणि या पुढेही बसेल, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

मनसे स्वबळावर लढणार

मनसे स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार? असा सवाल प्रकाश महाजन यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मनसे महायुतीत लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला 200 ते 250 जागा लढवण्याच्या तयारीला लागण्यास सांगितलेलं आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत, असं महाजन म्हणाले.

पवारांचा उतरता काळ सुरू होईल

आरएसएसचे मुखपत्रात जे लिहीलय ते अगदी खरं आहे. शरद पवार यांना 8 खासदार मिळाले आहे हा उच्चांक झाला. आता त्यांचा उतरता काळ सुरू होईल, असा दावाही त्यांनी केला.

कधी तरी तावडेंना विचारा

फोडफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका बसला, देवेंद्र फडणवीस कसे वागले हे कधीतरी विनोद तावडेंना जाऊन विचारा. इथेच सगळं फेडाव लागणार आहे. राज्यात कधी नव्हे ते फतवे निघाले आहेत. मतदान झालं आहे. आम्ही जातपात मानत नाही. आमचा एकच धर्म तो म्हणजे हिंदू धर्म. आम्ही जातपात विचारत पण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.