गुंड गुंडाचीच बाजू घेणार; प्रदीप शर्मांचा हितेंद्र ठाकूरांवर पलटवार

नालासोपारा मतदारसंघात (Nalasopara Constituency) बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Encounter specialist Pradeep Sharma) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

गुंड गुंडाचीच बाजू घेणार; प्रदीप शर्मांचा हितेंद्र ठाकूरांवर पलटवार

पालघर : नालासोपारा मतदारसंघात (Nalasopara Constituency) बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Encounter specialist Pradeep Sharma) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी प्रदीप शर्मांवर नाव न घेता सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचा आरोप केला होता. त्याला प्रतिउत्तर देत शर्मा यांनी ठाकूरांचे नाव न घेता गुंड गुंडाचीच बाजू घेणार असं म्हणत पलटवार केला आहे.

प्रदीप शर्मा म्हणाले, “पोलीस गुंडाना पकडतात, मारतात आणि समाजातून हद्दपार करतात. ते येथील राज्यकर्त्या लोकांना आवडत नाही का? गुंड कमी व्हायला नको का? ते स्वतः ताडा अंतर्गत आरोपी आहेत. म्हणून मग आम्ही दुसरे आरोपी पकडून नये का? गुंड गुंडाचीच बाजू घेणार. ते पोलीस अधिकाऱ्याची बाजू कधीच घेणार नाही.”

मी नालोसोपाऱ्यात दादागिरीसाठी करण्यासाठी अजिबात आलो नाही. येथे लोकांवर गुंडांची दादागिरी होत आहे. त्यापासून लोकांना मुक्त करण्यासाठी आलो आहे, असंही शर्मा यांनी नमूद केलं. पोलीस गणवेशावरील वादावरही शर्मा यांनी आपली बाजू माडंली. ते म्हणाले, “एकदा पोलीस अधिकारी असलेला व्यक्ती नेहमीच पोलीस अधिकारी असतो.”

निवडणुकीच्या काळात पालघरमध्ये तीन एके 47

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालघरमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि अमली पदार्थ सापडल्याचंही शर्मांनी सांगितलं. ते म्हणाले, पालघर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची असून मी पालघर पोलिसांचं अभिनंदन करतो. हा पकडलेला शस्त्रसाठा कुणाकडं येणार होता, पालघर जिल्ह्यात कशासाठी हा शस्त्रसाठा आला याचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच याच्यामागे कोण आहे हे पुढे येईल, असं मत प्रदीप शर्मांनी व्यक्त केलं. यातून शर्मांनी अप्रत्यक्षरित्या जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याचा संबंध वसई, विरार, नालासोपाऱ्यातील निवडणुकीत होणाऱ्या दहशतवादाच्या प्रचाराशी असल्याचंही सुचित केलं.

‘मला नोलासोपाऱ्यात विकासासाठी पाठवलंय’

प्रदीप शर्मा म्हणाले, “मला नालासोपाऱ्यात विकास करण्यासाठी पाठवलं आहे. येथील लोकांच्या डोळ्यात रोष आहे. त्यांना बदल हवा आहे. मी लोकांमध्ये फिरत असताना लोकांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. माझ्या रूपाने येथील लोकांना पर्याय मिळाला आहे. मी येथील दादागिरी संपवून लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी आलो आहे. म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला एबी फॉर्म देऊन नालासोपाऱ्याचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. शर्मा 3 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *