Praful Patel : ‘तुम्ही जो शब्दांचा वापर करताय, तो…’ छगन भुजबळांसंदर्भात प्रफुल पटेलांच महत्वाच वक्तव्य

"विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादीला, महायुतीला प्रचंड यश मिळालं. महाराष्ट्राच्या इतिहासातीत सर्वात जास्त बहुमत असलेलं सरकार स्थापन झालं. या पार्श्वभूमीवर पुढच्या पाच वर्षांची वाटचाल कशी असेल? पक्षाला अजून बळकट कसं करायचं? कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा? या विषयी विचारमंथन होईल" असं प्रफुल पटेल म्हणाले.

Praful Patel : 'तुम्ही जो शब्दांचा वापर करताय, तो...' छगन भुजबळांसंदर्भात प्रफुल पटेलांच महत्वाच वक्तव्य
Praful Patel-chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Jan 18, 2025 | 10:35 AM

“राष्ट्रवादीच दोन दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. बाबांचा आशिर्वाद घेऊन कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात केली पाहिजे. या प्रतिष्ठानने खूप चांगलं काम केलय. खूप विकास या परिसराचा झालाय. त्याचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला गोरगरीबांना मिळत आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच आजपासून शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन सुरु होतं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अधिवेशाच स्वरुप काय असेल? कुठल्या मुद्यांवर चर्चा होणार? यावर ते बोलले. “राजकीय पक्ष सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काही ना काही दिशा, धोरण याची सूचना करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड वर्षांपूर्वी अनेक घडामोडी झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं नाही. पण त्यानंतर विधानसभेला चांगलं यश मिळालं” असं त्यांनी सांगितलं.

“विधानसभेनंतर आता महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती अशा विविध संस्थांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मुंबई, दिल्लीशिवाय गाव, जिल्हा नियोजनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या निवडणुकांसाठी आमचा पक्ष सज्ज राहिला पाहिजे. उद्याची दिशा काय राहील यावर दोन दिवस चर्चा होईल” असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर राष्ट्रवादी लढणार का?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार की महायुती म्हणून? या प्रश्नावर प्रफुल पटेल म्हणाले की, “लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुका असतात. तिथे युती करुन लढणं आवश्यक असतं. पण स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर विशेष करुन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इथे कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा असते. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्यामुळे तडजोड करावी लागते. त्यामुळे जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून लढू. पण समजा एखाद्या ठिकाणी नाही लढलो, तर निवडणूक झाल्यानंतर जिथे महायुती बनवू शकतो, तिथे प्रयत्न करु” जम्मू, हरियाणाप्रमाणे दिल्लीतही भाजपच विधानसभेची निवडणूक जिंकेल असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

छगन भुजबळ आज पक्षाच्या अधिवेशनाला येणार का?

छगन भुजबळ यांची नाराजी, त्यांची अधिवेशनाला उपस्थिती यावरही प्रफुल पटेल बोलले. “छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत. ही घरातली गोष्ट आहे. काल मुंबईत माझी आणि भुजबळ साहेबांची भेट झाली. काही गोष्टी असतात. पण त्यांची नाराजी टोकाची नाही. घरात बसून मार्ग काढू शकत नाही, अशी स्थिती नाहीय. भुजबळ साहेब पक्षाचे आधारस्तंभ आहेत. 99 व्या साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे फ्रंटलाइन नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच त्यांचं मार्गदर्श मिळेल याची मला खात्री आहे” असं प्रफुल पटेल म्हणाले. पक्षाने अपमानित केल्याची त्यांची भावना आहे? या प्रश्नावर प्रफुल पटेल म्हणाले की, “तुम्ही जो शब्दांचा वापर करताय तो योग्य नाही. ठीक आहे, ते बोलले असतील मी यावर बोलणार नाही. भुजबळ साहेब आणि मी एका परिवारात, एका पक्षात काम करतो. काही घडलं असेल, तर दूर करु”

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.