AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या स्फोटाची खरी माहिती निघाली, तर काँग्रेसवरील उरला सुरला विश्वास‍ संपेल : प्रकाश आंबेडकर

भविष्यात मुंबईच्या बॉम्बस्फोटाची खरी माहिती बाहेर आली, तर काँग्रेसवरील (Prakash Ambedkar on Mumbai Blast and Congress Connection) उरला सुरलेला विश्वास‍ही संपेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुंबईच्या स्फोटाची खरी माहिती निघाली, तर काँग्रेसवरील उरला सुरला विश्वास‍ संपेल : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Oct 31, 2019 | 5:44 PM
Share

मुंबई: भविष्यात मुंबईच्या बॉम्बस्फोटाची खरी माहिती बाहेर आली, तर काँग्रेसवरील (Prakash Ambedkar on Mumbai Blast and Congress Connection) उरला सुरलेला विश्वास‍ही संपेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. प्रबुद्ध भारतमध्ये लिहिलेल्या संपादकीयमध्ये त्यांनी वंचितवरील अनेक आरोपांना थेट उत्तरं दिली. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दलही भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “इक्बाल मिर्चीचे प्रकरण बाहेर पडले, तर 1992 च्या मुंबई ब्लास्टचे खरे सूत्रधार बाहेर पडतील. राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते करायचे आणि त्याची चौकशी झाली तर आम्ही बळी (व्हीक्टीम) आहोत असं म्हणायचं. भविष्यात मुंबईच्या ब्लास्टची खरी माहिती निघाली, तर काँग्रेस (Prakash Ambedkar on Mumbai Blast and Congress Connection) हा सगळ्यात मोठा बळी ठरेल. त्यावेळी काँग्रेसवरील उरला सुरलेला विश्वास‍ही संपेल.”

लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. तसेच विधानसभेतही झाले. हे जरी खरे असले तरी राजकीय पक्ष, विचारवंत, समीक्षकांची, वंचितच्या नावाने दगडफोड चालूच आहे, असाही आरोप आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, “वंचित एक नवीन इतिहास आणि मार्ग आखू ईच्छिते. जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा जातीयवादी (कुटुंबशाही जपणारा) आणि भाजप या धार्मिक पक्षाच्या राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न करते. ही वस्तूस्थिती आहे की, वंचितकडे साधनं नाहीत. कदाचित ती साधनं असती तर सामाजिक बंधनं उलथून विजय प्राप्त झाला असता.”

“वंचितवर आरोप करण्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने ‘या’ प्रश्नांची उत्तरं द्या”

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अनेक प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले, “निवडणूक संपल्यानंतर आम्ही वंचितमुळे हरलो असा कांगावा काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. मात्र, 2014 मध्ये आमचे अस्तित्वही नव्हते. तरीही 2014 च्या लोकसभेत आणि विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे अस्तित्व का कमी झाले? याचे विश्‍लेषण काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीवर आरोप करण्यापूर्वी करावे.”

काही मतदारसंघात काँग्रेस आघाडीला 20 हजारपेक्षा कमी मतदान झाले. त्यांचे मतदान कोणाला गेले? त्यांनी वंचितला हरवण्यासाठी आपले मतदान शिवसेना-भाजपकडे तर वळवले नाही? अशी शंकाही आंबेडकरांनी व्यक्त केली.

“लोकसभेला 3 वेळा हरलेल्या 12 जागा देण्याची नियत काँग्रेसने का दाखवली नाही?”

आम्ही जो मार्ग अवलंबला आहे. तो शेवटचा श्वास‍ असेपर्यंत टिकवू, असं सांगताना त्यांनी टीकाकारांना सवाल केला. ते म्हणाले, “आम्ही काँग्रेसकडे लोकसभेला 3 वेळा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हरली आहे, अशा 12 जागा मागत होतो. त्या देण्याची नियतही काँग्रेसने दाखवली नाही. त्या जागा का दिल्या नाहीत हा प्रश्‍न काँग्रेसला विचारण्याची हिंमत तथाकथित पुरोगामी विचारवंतानी आणि पत्रकारांनी दाखवली नाही.”

‘काहीही पुरावे न देता पैसे घेतल्याचे आरोप, मात्र जनतेने आम्हाला टिकवलं’

देशातल्या मध्यमवर्गीय विचारवंतानी वंचितची संकल्पना ही निकाली काढली. व्यक्तिगत टीका केली, भाजपची ‘बी टीम’ म्हणून ओरड झाली. काहीही पुरावे न देता पैसे घेतल्याचे आरोप केले गेले. टीकेची झोड उठवली. तरीही लोकांनी मतदान देऊन आम्हाला टिकवले, असंही आंबेडकरांनी नमूद केलं.

आंबेडकर म्हणाले, “एकाप्रकारे पुरोगामी (केवळ भाजपविरोधी म्हणून पुरोगामी) लोकांनी, सेक्युलरच्या नावाखाली सामाजिक वर्चस्व टिकले पाहिजे हीच भूमिका घेतली. त्यांच्या विचारांची, आचाराची आम्ही कदर करतो. पण त्यांनी ‘वंचितांचे राजकारण’ या संकल्पनेची चर्चा राजकीय पटलावर होऊच दिली नाही.”

संबंधित बातम्या:

हे सरकार घालवा, नाही तर बँकेतील उर्वरित पैसेही मोदी काढून घेतील : प्रकाश आंबेडकर

‘या’ मतदारसंघात दादागिरी चालणार नाही, पोलीस आपल्यासोबत : प्रकाश आंबेडकर

वंचितला सत्ता द्या, जीएसटीमध्ये सुधारणा करु : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हे भुरटे चोर, भाजपवाले डाकू आहेत : प्रकाश आंबेडकर

पवार-चव्हाण शेतकऱ्यांचे नेते नाही, तर कारखान्यांचे मालक : प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत चर्चा बंद, एमआयएमसाठी दारं अजूनही खुली : प्रकाश आंबेडकर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.