लातूर, औरंगाबाद ते ठाणे, काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल, 9 नवे जिल्हाध्यक्ष

बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत पाठवलेला प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला.

लातूर, औरंगाबाद ते ठाणे, काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल, 9 नवे जिल्हाध्यक्ष

मुंबई : काँग्रेसमध्ये जिल्हास्तरीय खांदेपालट करण्यात आले असून 9 नव्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. लातूर, चंद्रपूर, औरंगाबादला जिल्हा आणि शहर, तसेच भंडारा, गोंदिया आणि ठाणे काँग्रेसला नवे जिल्हाध्यक्ष मिळाले. (Presidents of the District and City Congress Committee in Maharashtra Changed)

एकीकडे राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याची मागणी जोर धरत असताना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरु असतानाच बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत पाठवलेला प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला.

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. लातूर जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे खंदे समर्थक श्रीशैल उटगे यांची वर्णी लागली. तर शहराध्यक्षपदी पालकमंत्री अमित देशमुख यांचे समर्थक अ‍ॅड. किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्या, काँग्रेसच्या बैठकीत मागणीला जोर

लातूरचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांनी गेली दहा वर्ष जबाबदारी सांभाळली. 2017 मध्ये त्यांनी पक्षाकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तो नामंजूर केला. आता त्यांचा दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे यांची वर्णी लावली.

काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष

लातूर जिल्हाध्यक्ष- श्रीशैल मल्लिकार्जुन उटगे

लातूर शहराध्यक्ष- अ‍ॅड. किरण जाधव

औरंगाबाद जिल्हाध्यक्ष- डॉ. कल्याण काळे

औरंगाबाद शहराध्यक्ष- मोहम्मद हिशाम उस्मानी

ठाणे शहराध्यक्ष- अ‍ॅड. विक्रांत चव्हाण

(Presidents of the District and City Congress Committee in Maharashtra Changed)

भंडारा जिल्हाध्यक्ष- मोहन विठ्ठलराव पंचभाई

गोंदिया जिल्हाध्यक्ष- नामदेव दसाराम किरसान

चंद्रपूर जिल्हाध्यक्ष- रितेश सत्यनारायण तिवारी

चंद्रपूर शहराध्यक्ष- प्रकाश मारोतराव देवतळे

(Presidents of the District and City Congress Committee in Maharashtra Changed)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *