AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांना कोर्टाचा धक्का, शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाने दणका दिला आहे (Misinformation allegation on Chandrakant Patil).

चंद्रकांत पाटलांना कोर्टाचा धक्का, शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
| Updated on: Aug 21, 2020 | 10:49 PM
Share

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाने दणका दिला आहे (Misinformation allegation on Chandrakant Patil). न्यायालयाने निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावर 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पुणे न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी हे आदेश दिले आहेत.

अभिषेक हरिदास यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोटी माहिती सादर केल्याचा आरोप केला होता. तसेच तक्रार करत याबाबत पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. आपल्यावरील आरोप आणि चौकशीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी माझ्या विरुद्धातील तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली तथ्यहीन तक्रार असल्याचा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “बातम्यांच्या माध्यमातून आणि काही मित्रांकडून समजले की माझ्या विरुद्ध एक तक्रार न्यायालयात दाखल केली गेली आहे. अजून माझ्याकडे न्यायालयीन आदेशाची नोटीस प्रत आलेली नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही. ही तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे. त्यामुळे ती तथ्यहीन आहे.”

“निवडणूक अर्ज भरताना अशा पद्धतीची तक्रार करण्यास वाव असतो. अर्ज भरण्याच्यावेळी छाननी करताना आक्षेप नोंदवण्याचा अधिकार असतो. ते सर्व आक्षेप निवडणूक अधिकाऱ्याने रुल आऊट केल्यानंतरच अर्ज ग्राह्य धरला जातो. निवडणूक अर्ज भरताना मी सर्व आवश्यक माहिती दिलेली आहे. तरी देखील कोणाला आक्षेप असल्यास उच्च न्यायालयात तो निवडणूक याचिका दाखल करु शकतो,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

IAS Transfer | चंद्रकांत पाटलांकडून सकाळी ‘ट्रान्सफर मंत्रालय’ खिल्ली, दुपारी चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली

‘तुम्ही काही केलंच नाही तर झोंबतं कशाला?’, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात शाब्दिक चकमक

‘बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार’, चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ पाहा:

Misinformation allegation on Chandrakant Patil

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...