पुण्यातील अॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव गुंडाळला जाण्याची शक्यता!

योगेश बोरसे

| Edited By: |

Updated on: Aug 26, 2021 | 6:17 PM

काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. या ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी घेतला होता. दरम्यान आज महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब झाली आणि ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव लांबणीवर पडला आहे.

पुण्यातील अॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव गुंडाळला जाण्याची शक्यता!
पुणे महापालिका

Follow us on

पुणे : शहरातील 270 अॅमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आणलेला प्रस्ताव गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. या ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी घेतला होता. दरम्यान आज महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब झाली आणि ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव लांबणीवर पडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अचानक भूमिका बदलल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Pune Mahapalika Proposal to lease 270 amenity spaces in Pune city stalled)

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही खदखद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत ॲमेनिटी स्पेसचा प्रस्ताव ठेवला गेला. मात्र, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केल्यामुळे सभा तहकुब करण्यात आली. भाजपने महापालिकेत बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करून घेतला असता तरी, राज्य सरकारने तो अडवला असता, असं महाविकास आघाडीच्या नेत्याचं म्हणणं आहे.

भाजपचा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यी प्रभाग पद्धती जाहीर केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांनी या पद्धतीला विरोध केला आहे. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे, असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. खासदार गिरीश बापट यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध असल्याचं सांगितलं. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय आहे, कॅबिनेट काय निर्णय घेते ते बघू, असं बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2011 च्या जणगणनेनुसार ठरणार प्रभाग

निवडणूक आयोगाने पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातल्या 18 महानगरपालिकांमध्ये एक प्रभाग एक सदस्य पद्धतीनुसार निवडणूक होईल असं स्पष्ट केलं आहे. 2021 ची जनगणना झाली नसल्याने 2011 च्या जनगणनेनुसारच ही प्रभाग रचना केली जाणार आहे. एका प्रभागात सरासरी 21 हजार 423 मतदार असणार आहेत. आयोगाच्या निकषानुसार किमान मतदारांची संख्या ही सरासरीच्या 10 टक्के कमी आणि कमाल मतदारांची संख्या सरासरीच्या 10 टक्के जास्त असू शकतात. त्यानुसार एका प्रभागात कमीत कमी 19 हजार 221 मतदार तर जास्तीत जास्त 23 हजार 565 मतदार असू शकतात.

अशी ठरणार प्रभागरचना

प्रभाग रचनेनुसार प्रभागाची सीमा ठरवताना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच प्रभाग रचना केली जाणार आहे. यामध्ये मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते उड्डाणपूल या यांच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका इमारतीचे किंवा एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. मोकळ्या जागांसह सर्व सार्वजनिक जागा या कोणत्या ना कोणत्या प्रभागात यायला हव्यात. शिवाय प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं आहे.

इतर बातम्या :

पुणे महापालिका निवडणूक | कशी ठरणार एक सदस्यीय प्रभाग रचना? कधी होणार निवडणूक? वाचा सविस्तर

दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं अंगलट, पोलीस निरीक्षकाबाबत ‘हे’ आदेश

Proposal to lease 270 amenity spaces in Pune city stalled

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI