AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे मेट्रोवरुन राष्ट्रवादी-फडणवीस आमने सामने, मोदींच्या नावानं कुरघोडी?

श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे फडणवीसांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.

पुणे मेट्रोवरुन राष्ट्रवादी-फडणवीस आमने सामने, मोदींच्या नावानं कुरघोडी?
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 5:32 PM
Share

पुणे : पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे पुणे मेट्रोवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं बोललं जात आहे. श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे फडणवीसांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे. (Pune Metro will be inaugurated by PM Narendra Modi, claims Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजीनगर परिसरातील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी सिव्हिल कोर्ट स्टेशन हे मल्टॉमॉडेल स्टेशनचं एक चांगलं उदाहरण असल्याचं फडणवीस म्हणाले. सगळ्या प्रकारचं काम इथं पाहायला मिळत आहे. अतिशय वेगानं महामेट्रोनं काम केलं आहे. मी महामेट्रोचं अभिनंदन करतो. 2016 ला मोदी सरकार आणि राज्य सरकारने या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर वेगानं हे काम होत आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना इथं पाहायला मिळेल. कोरोनामुळे कदाचित थोडा उशीर होईल, अशी शक्यताही फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होणार

श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते ट्रायल रनचं उद्घाटन झालं. पण काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होईल. त्याला कुणी विरोध करणार नाही, असा दावाही फडणवीसांनी केलाय. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा याला खूप विरोध होता. पण आता काम पुढे जात आहे. मेट्रोच्या पुढच्या कामांना केंद्राकडून लवकरात लवकर कशी मान्यता मिळेल, निधी मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

‘2024 ला आमचं एकच इंजिन असणार’

मेट्रोच्या कामाच्या पाहणीनंतर देवेंद फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर 2024मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

दिल्लीला जाणार

यावेळी फडणवीस यांनी दिल्लीत जाणार असल्याचंही सांगितलं. दिल्लीत भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले आहेत. तर पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते सोमवारी दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार, मोदी सरकारने पद्म पुरस्कारांचे निकष बदलल्याचा फडणवीसांचा दावा

2024 ला आमचं एकच इंजिन असणार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; चंद्रकांतदादा-राज भेट निष्फळ?

Pune Metro will be inaugurated by PM Narendra Modi, claims Devendra Fadnavis

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.