बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकानंतर गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाचा वाद, मुंडेंच्या स्मारकासाठी 110 झाडांवर कुऱ्हाड?

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी झाडांची कत्तल करण्यात येणार (Gopinath Munde memorial tree cutting) आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जवळपास 100 पेक्षा जास्त झाडांवर कुऱ्हाड चालवणार असल्याचे बोललं जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:51 PM, 13 Dec 2019

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून झाडे तोडण्यावरुन चांगलंच राजकारण तापलं (Gopinath Munde memorial tree cutting) आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी झाडांची कत्तल करण्यात येणार (Gopinath Munde memorial tree cutting) आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जवळपास 100 पेक्षा जास्त झाडांवर कुऱ्हाड चालवणार असल्याचे बोललं जात आहे. यामुळे आता या स्मारकाला पर्यावरणप्रेमींकडून विरोध होण्याची शक्यता (Gopinath Munde memorial tree cutting) आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथे उभारण्यात येणार आहे. नुकतंच सार्वजनिक बांधकाम खात्याने महापालिकेला पत्र पाठवत मुंडेच्या स्मारकासाठी 110 झाडांवर कुऱ्हाड चालवण्याबाबत परवानगी मागितली आहे. पालिका प्रशासनाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र जर प्रशासनाने झाड तोडण्यासाठी परवानगी दिली तर यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबादेतील शासकीय दूध योजनेच्या जागेवर उभारण्यात येणार आहेत. भाजप सरकारने ही जागा गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी देऊ केली. सिडकोतर्फे या स्मारकाचे बांधकाम केले जाणार आहे. मात्र आता स्मारकाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागाने पालिकेच्या उद्यान विभागाला नुकतंच पत्र पाठवलं आहे. त्यात मुंडे स्मारकासाठी शासकीय दूध योजनेच्या जागेवरील 110 झाडे तोडावी लागणार आहे. ही झाडे तोडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीवर पालिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला (Gopinath Munde memorial tree cutting) नाही.

यापूर्वी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक यासाठी झाडे तोडण्यात येणार होती. मात्र अनेक पर्यावरणप्रेमींना याला विरोध केला होता.

आरे कॉलनीत झाडे तोडण्यास स्थगिती

भाजप सरकार गेल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळून सत्तास्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी झाडांच्या तोडकामावर स्थगिती आणली. यानंतर सर्वांचे लक्ष औरंगाबादमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकडे लागले होते. कारण या स्मारकासाठी शिवसेना अनेक झाडांची कत्तल करणार असल्याचे बोललं जात होते. तशा चर्चाही सुरु (Gopinath Munde memorial tree cutting) होत्या.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी झाडांची कत्तल?

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार आहेत, अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

“शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. तसेच शिवसेना कमिशनखोरी आहे. त्यांचा ढोंगीपणाचा आजार लवकर बरा होईल,” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं (Gopinath Munde memorial tree cutting) होतं.

मात्र अमृता फडणवीस यांच्या ट्विटला शिवसेनेनंही चोख उत्तर दिलं होतं.  “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आम्ही एकही झाड न तोडता हे स्मारक कसं होईल. त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहे,” असं स्पष्टीकरण औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.