राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये?, मोदींच्या सभेत प्रवेशाची शक्यता

राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये?, मोदींच्या सभेत प्रवेशाची शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. कारण काँग्रेसचे बडे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे स्वत: भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे अहमदनगरमधील सभेत, राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. याच सभेत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने, भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.  एकीकडे मुलाला काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे नाराज आहेत. तर दुसरीकडे मुलाचा प्रचार करण्यासाठी पक्षविरोधी भूमिका घ्यावी लागत असल्याने ते कात्रीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील हे थेट काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याची चिन्हं आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा सोपवला होता. गेल्या महिन्यात 19 मार्च रोजी राधाकृष्ण विखेंनी आपला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज होते. त्यातच सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने पक्ष सोडल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दबाव वाढला होता. पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती.

संबंधित बातम्या

सुजय विखेंना ‘या’ अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा!   

राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा   

सुजयविरोधात प्रचार करणार नाही : विखे पाटील  

राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार, हायकमांडला निर्णय कळवला?  

पवारांच्या मनात द्वेष, राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील  

सुजयविरोधात प्रचार करणार नाही : विखे पाटील  

मी दुसऱ्यांची पोरं धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही : उद्धव ठाकरे 

रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित?  

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI