AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात भाजप खासदाराचं उद्या शक्तिप्रदर्शन, 50 हजार कार्यकर्त्यांची रॅली, रोखण्याचा प्लॅनही ठरणार

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणारा विरोध आणखी तीव्र झाला आहे. भाजप खासदार राज ठाकरेंना अयोध्या दौरा करण्यापासून रोखण्यावर ठाम आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह उद्या राज ठाकरेंना विरोध करत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात भाजप खासदाराचं उद्या शक्तिप्रदर्शन, 50 हजार कार्यकर्त्यांची रॅली, रोखण्याचा प्लॅनही ठरणार
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात भाजप खासदार आक्रमकImage Credit source: tv9
| Updated on: May 09, 2022 | 9:18 PM
Share

अयोध्या : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या (Ayodhya Visit) दौऱ्यावरून सध्या दोन गट पडलेले पहायला मिळत आहे. एकिकडे राज ठाकरेंनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे. त्याला भाजप नेत्यांचं (BJP) समर्थन मिळत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणारा विरोध आणखी तीव्र झाला आहे. भाजप खासदार राज ठाकरेंना अयोध्या दौरा करण्यापासून रोखण्यावर ठाम आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह उद्या राज ठाकरेंना विरोध करत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. फक्त बैठकच नाही तर अयोध्यातील साधू, संतासह परिसरातील 50 हजार उत्तर भारतीय नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय. ब्रिजभूषण सिंह नवाबगंजमधील निवासस्थानापासून ते नंदिनीनगर रॅली काढणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच उद्याच्या बैठकीत राज ठाकरेंना कसं रोखायचं यासंदर्भात रणनीती ठरणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.

सेनेचे बॅनरही हटवले

तर दुसरीकडे प्रशासनाने अयोध्येतील शिवसेनेचे बॅनर हटवले आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त असली आणि नकली अशा आशयाचे बॅनर शिवसेनेकडून अयोध्या शहरात लावण्यात आले होते. अयोध्यातील सेनेची बॅनर्स हटवण्यात आले, आहेत अशी माहिती समोर आल्याने काहीसा संभ्रमही निर्मणा झाला आहे. कारण राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मग भाजपचा छुपा पाठिंबा आहे का? अशा चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत. नया घाट परिसरात सेनेने आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी ही बॅनरबाजी केली होती. नकली से सावधान असली आ रहा बॅनर्सवर उल्लेख या बॅनगरवर सेनेकडून करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसात राज्याच्या राजकाणातही हिंदुत्वावरून वार पलटवार सुरू आहेत.

भाजप खासदाराची मनधरणी सुरू

दुसरीकडे राज ठाकरेंच्या भाजप दौऱ्याला होणारा विरोध मावळावा यासाठी भाजपकडून या खासदाराची मनधरणीही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र केंद्रातील नेत्यांचाही फोन घेण्यास यांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता राज ठाकरेंना दौरा करायचा असेल तर तारीख बदलावी लागेल, माफी मागण्याची वेळ आता गेली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंनी माफी मागितली तरी त्यांना येऊ देणार नाही, अशीही भूमिका यांच्याकडून घेण्यात आलीय. त्यामुळे आता उद्याच्या यांच्या बैठकीत काय रणनिती ठरते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.