सुशांतच्या आत्महत्येइतकी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर व्हावी, ते सुटतील तरी : राजू शेट्टी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर सुरु असलेल्या चर्चेवरुन राजू शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला

सुशांतच्या आत्महत्येइतकी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर व्हावी, ते सुटतील तरी : राजू शेट्टी

कोल्हापूर : “आत्महत्या करणारा कोण आहे, हे बघून चर्चा होणार असेल (Raju Shetti On Sushant Singh Rajput Case), तर आपण कुठे निघालो आहोत”, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर सुरु असलेल्या चर्चेवरुन राजू शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला (Raju Shetti On Sushant Singh Rajput Case).

“लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किती झाल्या? आज वीज बिल जास्त आलं, म्हणून ग्राहकाने आत्महत्या केली. यावर आपण चर्चा करणार आहोत, की नाही”, असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. “सुशांतच्या आत्महत्येवर जितकी चर्चा होते, तेवढी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली, तर किमान प्रश्न सुटतील”, असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं.

घराचं वीज बिल 40 हजार, नागपुरात व्यक्तीची आत्महत्या

नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Raju Shetti On Sushant Singh Rajput Case).

लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वारंवार MSEB च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

Raju Shetti On Sushant Singh Rajput Case

संबंधित बातम्या :

सिद्धार्थ पिठानीसोबत बहिणीच्या वर्तनावर सुशांत नाखुश, रिया चक्रवर्तीकडून व्हाॅट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

Sushant Singh Rajput | ईडीकडून रियानंतर भाऊ शौविकची चौकशी, बँक खातं ते सुशांतच्या भांडणापर्यंत अनेक प्रश्न

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *