खडसे सिंचन घोटाळ्यातील साक्षीदार म्हणूनच त्यांना फोडले, राम शिंदे यांचा दावा

एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केला आहे.

खडसे सिंचन घोटाळ्यातील साक्षीदार म्हणूनच त्यांना फोडले, राम शिंदे यांचा दावा

अहमदनगर : एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर शिंदे कर्जत येथे पत्रकारांशी बोलत होते. (Ram Shinde says Eknath Khadse is a witness in the irrigation scam)

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीची (सक्तवसुली संचालनालय) चौकशी सुरु आहे. याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते की, 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मग ते आमदार कुठे गेले? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आज एकही आजी-माजी आमदार खडसेंसोबत राष्ट्रवादीमध्ये गेला नाही. कोणीही भाजप सोडून दुसरीकडे जाणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपमध्ये कोणतीही भरती-ओहोटी येणार नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही देशातील सर्वात मोठी पार्टी आहे. काँग्रेस सोडल्यास कोणत्याही पक्षाला देशात बहुमत मिळाले नाही, मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ते मिळाले. त्यामुळे भरती-ओहोटी काही येणार नाही, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.

शिंदे म्हणाले की, 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळयाप्रकरणी ईडीची चौकशी सूर आहे. त्यामध्ये खडसे प्रमुख साक्षीदार होते. आता ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. खडसेंची साक्ष यापूर्वीच झाली आहे. त्यामुळे त्यांना फोडून काहीही उपयोग नाही. याप्रकरणातील आरोपींवर निश्चितच कारवाई होईल.

संबंधित बातम्या

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

आज मन हलकं झालं, नाही तर मी गेलोच होतो; एकनाथ खडसे भावूक

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच चंद्रकांतदादांची टीका; खडसे-पाटील जुंपली

(Ram Shinde says Eknath Khadse is a witness in the irrigation scam)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI