AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नाणार’वरुन शिवसेनेला धक्का, स्थानिक राष्ट्रवादीचा पाठिंबा

नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असताना स्थानिक राष्ट्रवादीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे

'नाणार'वरुन शिवसेनेला धक्का, स्थानिक राष्ट्रवादीचा पाठिंबा
Nanar Refinery Supporters
| Updated on: Feb 28, 2020 | 9:26 AM
Share

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिक राष्ट्रवादीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Ratnagiri NCP Supports Nanar Refinery)

राष्ट्रवादीच्या रत्नागिरी तालुका विभागाने नाणार रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे प्रकल्पाला खो मिळाला. नाणार रिफायनरी समर्थकांकडून निमंत्रण आल्यास नक्की जाणार, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, स्वतःच्या मतदारसंघात रोजगार आणू न शकलेले आता दुसऱ्याच्या मतदारसंघात लुडबूड कशाला करत आहेत? असा टोला स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना लगावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं असलं, तरी स्थानिक पातळीवर कुरबुरी सुरुच असल्याचं दिसत आहे.

नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची पक्षाकडून पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. शिवसेनेने राजा काजवे यांना विभागप्रमुख पदावरुन हटवत त्याजागी कमलाकर कदम यांची नियुक्ती केली.

‘सामना’ वृत्तपत्रातून नाणार रिफायनरी प्रकल्पाचे गुणगान गाणारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाणारचे समर्थन करण्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात राजापूरमधील शिवसैनिकांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दाखवण्यासाठी थेट सिंधुदुर्गात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते.

‘शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो. ते ‘सामना’तून मांडले जातात. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाहीत, हे मी नमूद करु इच्छितो. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असं होत नाही. म्हणून मी म्हणतो, अशा जाहिराती दररोज येत असतात, हा विषय संपला’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या नाणारच्या जाहिरातीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

(Ratnagiri NCP Supports Nanar Refinery)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.